Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात (Accident) मृत्यू झाला. रिद्धी जवळपास 23 बाईक रायडर्सच्या ग्रुपसोबत बस्तरला फिरण्यासाठी गेली होती. मात्र, परतीच्या प्रवासादरम्यान मरकाटोला घाटाजवळ तिच्यावर काळाने घाला घातला.


मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास बाईक रायडर्सचा ग्रुप एनएच-30 मार्गावरून प्रवास करत होता. ग्रुपमधील काही रायडर्स पुढे निघून गेले होते, तर रिद्धी काही सहकाऱ्यांसोबत मागून येत होती. यावेळी मरकाटोला घाट परिसरात भरधाव ट्रेलरने रिद्धीच्या बाईकला जोरदार धडक दिली. (Mumbai News)



रिद्धी एमएच 12 एसपी 0835 क्रमांकाच्या बाईकवरून प्रवास करत होती. ट्रेलरची धडक इतकी जोरदार होती की, रिद्धी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने पुढे गेलेल्या ग्रुपमधील इतर रायडर्सना याची माहिती दिली. त्यानंतर 112 क्रमांकावर संपर्क साधून रिद्धीला चारामा आरोग्य केंद्रात नेण्यात आले.


चारामा आरोग्य केंद्रात रिद्धीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी धमतरी येथील श्रीराम रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (Accident News)


दरम्यान, अपघातानंतर ट्रेलर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. फरार ट्रेलर चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.


रिद्धीच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना दिली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. बाईक राइडिंगचा अनुभव घेण्यासाठी सहकाऱ्यांसोबत बस्तरच्या प्रवासाला गेलेल्या रिद्धीचा प्रवास अशा दुर्दैवी पद्धतीने संपल्याने तिच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने