Vakola Unauthorized Shops : वाकोलातील पदपथांवरील ३७ अनधिकृत दुकानांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, वाकोला परिसरातील राजेंद्र कांबळे मार्गालगतच्या पदपथावर अडथळा निर्माण करणाऱ्या ३७ अनधिकृत दुकानांवर मंगळवार ११ ऑगस्ट २०२६ रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पूर्व ’ विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. (Vakola Unauthorized Shops)


उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. (Vakola Unauthorized Shops)



या पार्श्वभूमीवर, उपायुक्त (परिमंडळ-३) विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त ( एच पूर्व विभाग) मृदुला अंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईत वाकोला येथील राजेंद्र कांबळे मार्गालगतचे पदपथ मोकळे करण्यात आले. या अंतर्गत, पदपथांवर उभारण्यात आलेले ३७ अनधिकृत दुकाने निष्कासित करण्यात आली. तसेच, पदपथांवर अडथळा निर्माण करणारे साहित्य जप्त करण्यात आले. (Vakola Unauthorized Shops)



सुमारे ३१ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ०४ वाहने, ०२ डंपर, ०१ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी, पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, पादचाऱ्यांसाठी सुलभ पदपथ उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे, पदपथांवर अडथळा निर्माण होईल, असे अनधिकृत बांधकाम करू नये अथवा साहित्य ठेवू नयेत. असे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. (Vakola Unauthorized Shops)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने