New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही


मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे रूपडे बदलण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकलची निर्मिती करण्यात येणार आहे. या लोकलची पहिली मालिका २०२७ मध्ये मुंबईत दाखल होईल. त्यानंतर पुढील दोन-तीन वर्षांत म्हणजे २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल आधुनिक, स्वच्छ आणि वातानुकूलित करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी दिली. (New AC Local)


वरळी डोम येथे माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मुंबईची लोकल सेवा मेट्रोच्या धर्तीवर आधुनिक आणि एसी करण्याचा निर्णय आधीच झाला होता. मात्र, ज्या गतीने काम सुरू होते, त्या गतीने २०३० पर्यंत अपेक्षित बदल करणे शक्य झाले नसते. त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnaw) यांच्यासोबत बैठक घेऊन या कामाला वेग देण्याची विनंती केली. त्यानंतर केंद्र सरकारने देशातील तीन आधुनिक रेल्वे कोच कारखान्यांमध्ये या लोकलच्या निर्मितीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी उत्पादन करण्याऐवजी तीन कारखान्यांमध्ये काम विभागले जाणार असून, लोकलच्या निर्मितीला वेग मिळणार आहे. (New AC Local)



या लोकलची पहिली मालिका २०२७ मध्ये मुंबईत येईल. त्यानंतर पुढील दोन-तीन वर्षांत मुंबईतील लोकल सेवा मेट्रोसारखी आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि वातानुकूलित करण्याचे उद्दिष्ट आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकलच्या खरेदीला यापूर्वीच केंद्राची मंजुरी मिळाली होती. या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक सुविधा असणार आहेत. (New AC Local)



एसी लोकलमुळे सामान्य प्रवाशांवर आर्थिक बोजा पडणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “एसी झाल्यानंतर सेकंड क्लासचे तिकीट वाढवण्याची गरज भासणार नाही. मुंबईकरांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकर अनेकदा म्हणायचे की मेट्रोच्या सेवा आधुनिक झाल्या, मात्र लोकलचे काय? जुन्या ट्रेन कधी बदलणार? आता ही खंत दूर होणार आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले. (New AC Local)




Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म