MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गावाबाहेर असलेले हजारो कोकणवासी या दोन सणांच्या निमित्ताने गावी जातात. यामुळे गणेशोत्सव आणि शिमग्याच्या काही दिवस आधी कोकणात जाणाऱ्या सर्व ट्रेन, बस खचाखच भरल्याचे दिसते. यंदा गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सवातील पहिला दिवस हा सोमवार १४ सप्टेंबर २०२६ रोजी आहे. गणेशोत्सवासाठी अनेक ट्रेन आणि बसचे बुकिंग अॅडव्हान्समध्ये झाले आहे. अनेकजण आजही खासगी वाहनातून अथवा विशेष ट्रेन वा बसमधून गावी जाण्यासाठी बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात राहणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.





शिवसेना आमदार निलेश राणे यांनी गणेशभक्तांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. ही ट्रेन शिवसेना एक्सप्रेस या नावाने चालवली जाणार आहे. नियोजनानुसार शिवसेना एक्सप्रेस यंदा शनिवार १२ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईच्या दादर स्थानकावरून सुटणार आहे. गाडीचे गंतव्य स्थान (शेवटचे स्थानक) कुडाळ हे आहे. ही गाडी १२ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुटणार आहे. शिवसेना एक्सप्रेससाठी सोमवार ते शनिवार या कालावधीत दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी पाच या वेळेत बुकिंग करता येईल. बुकिंग करण्यासाठी संबंधितांना कुडाळ अथवा मालवण विधानसभा मतदारसंघाचे मतदान ओळखपत्र (Voter ID) किंवा आधार कार्ड (Aadhaar Card) दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने गणेशभक्तांसाठी विनामूल्य प्रवासाची व्यवस्था केली जाणार आहे. या प्रवासाकरिता बुकिंग करणे आवश्यक आहे. हे बुकिंग सुरू आहे.


शिवसेना आमदार निलेश राणे यांनी मुंबई आणि आसपास राहणाऱ्या कोकणवासीयांना गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी शिवसेना एक्सप्रेसची व्यवस्था केली आहे. या गाडीने प्रवास करू इच्छिणाऱ्यांनी लवकर बुकिंग करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.



मागील काही वर्षांपासून आमदार निलेश राणे एक उपक्रम सातत्याने राबवत आहेत. ते दरवर्षी गणेशोत्सवात गावी जाऊ इच्छिणाऱ्या कोकणवासीयांसाठी विशेष गाडीची व्यवस्था करतात. यंदा आमदार निलेश राणे यांनी शिवसेना एक्सप्रेस या विशेष गाडीची व्यवस्था केली आहे. या गाडीच्या बुकिंगसाठी सोमवार ते शनिवार या कालावधीत दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी पाच या वेळेत ८४२५९०१२०२ किंवा ८४२५९०१५४५ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना एक्सप्रेसचा प्रवास मोफत आहे. या प्रवासाकरिता कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही, असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले आहे. या गाडीसाठी बुकिंग केल्यास ते हस्तांतरित करता येणार नाही. बुकिंगसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळेल. तसेच बुकिंग करण्यासाठी संबंधितांना कुडाळ अथवा मालवण विधानसभा मतदारसंघाचे मतदान ओळखपत्र (Voter ID) किंवा आधार कार्ड (Aadhaar Card) दाखवावे लागणार आहे, असे आमदार निलेश राणे यांनी एक्स पोस्ट करून जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने