Har Ghar Tiranga : प्रत्येक विभागात निघणाऱ्या तिरंगा रॅलीत मुंबईकरांनी सहभागी व्हावे

- मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना आवाहन


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीदरम्यान 'घरोघरी तिरंगा' अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. यंदाच्या अभियानाचे विशेष आकर्षण म्हणजे 'वंदे मातरम्' या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Har Ghar Tiranga)

केंद्र शासनाकडून सन २०२२ पासून 'घरोघरी तिरंगा' अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. यंदा 'वंदे मातरम्' या गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. (Har Ghar Tiranga)



या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविले जाणार आहे. मुंबई महानगरातही हे अभियान व्यापकपणे आणि अत्यंत उत्साहात राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. (Har Ghar Tiranga)

'घरोघरी तिरंगा' अभियान अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) तिरंगा रॅली आणि ई-बाइक रॅली, वंदे मातरम् प्रदर्शन, मातरम् रांगोळी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये वंदे मातरम् गीत गायन करण्यात येईल. (Har Ghar Tiranga)



नागरिकांनी राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून https://harghartiranga.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावी. यावर्षी सेल्फीसोबत 'वंदे मातरम्' गीताचे बोल असलेली विशेष व्हिडिओ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभियानाबाबत अधिक माहितीसाठी आणि स्वयंसेवक नोंदणीसाठी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुंबईतील नागरिकांनी या राष्ट्रीय अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Har Ghar Tiranga)

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर