Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर!



मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाणीपुरवठा खंडित झाल्याने काही तास गैरसोयीचा सामना करावा लागला. नियमित पाणीपुरवठ्यात अडचण आल्याने रहिवाशांना दैनंदिन गरजेच्या कामांसाठी पाण्याची उपलब्धता करून घेण्याची कसरत करावी लागली. कलिना पोलीस क्वार्टर्स परिसरात दोन वेगवेगळ्या कॉलनी आहेत. या दोन्ही कॉलनींमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने रहिवाशांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. (Mumbai Water Cut)


कलिना परिसरातील पोलीस वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे येथील रहिवाशांसाठी सुरळीत पाणीपुरवठा महत्त्वाचा आहे. मात्र, एक दिवस पाणीपुरवठा खंडित झाल्याने सकाळपासूनच अनेक कुटुंबांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले.



पाणी उपलब्ध नसल्याने स्वयंपाक, कपडे धुणे, घरातील स्वच्छता तसेच इतर दैनंदिन कामांवर परिणाम झाला. काही रहिवाशांनी पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापरासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था अन्य मार्गाने केली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ड्युटीवर जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची प्रचंड गैरसोय झाली.  (Mumbai Police)


दरम्यान, अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्वपर्यंतच्या के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत 2400 मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम मंगळवार, 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार, 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हाती घेण्यात आले होते. या कामामुळे के दक्षिण विभागातील काही परिसरात या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, तर संपूर्ण एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे कलिना पोलीस क्वार्टर्ससह संबंधित परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. (Water Supply)

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा