Water Resources Department : धरणांच्या काठी पर्यटनाला येणार नवा बहर

- 'जलसंपदा' आणि 'पर्यटन' विभागाचा संयुक्त उपक्रम; जायकवाडी, कोयना, उजनीसह १० प्रमुख धरणांचा समावेश


मुंबई : अथांग जलसाठा आणि निसर्गरम्य परिसर लाभलेल्या राज्यातील प्रमुख धरणांच्या किनाऱ्यांलगत आता पर्यटनाला नवा बहर येणार आहे. जायकवाडी, भंडारदरा, कोयना, उजनी आणि वैतरणा यांसारख्या राज्यातील दहा मोठ्या धरणांच्या लगत असलेल्या जमिनींवर पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाने कंबर कसली आहे. गेल्या वर्षभरापासून लालफितीत अडकलेल्या या प्रस्तावाला आता पुन्हा प्रशासकीय स्तरावर गती देण्यात येत असून, जलसंपदा विभागाच्या सहकार्याने हा महत्त्वकांक्षी प्रकल्प साकारला जाणार आहे.


धरण परिसरातील अथांग जलसाठा आणि हिरवाईचा निसर्ग अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या भागांना भेट देतात. मात्र, सोयी-सुविधांच्या अभावामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होते. हीच बाब लक्षात घेऊन पर्यटन संचालनालयाने जलसंपदा विभागाच्या मालकीच्या या मोकळ्या जागा भाडेतत्त्वावर मागितल्या आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी अत्याधुनिक निवास व्यवस्था, रेस्टॉरंट्स, आकर्षक टेन्ट सिटी आणि सुरक्षित वॉटर स्पोर्ट्ससारखे उपक्रम राबवण्याची आखणी करण्यात आली आहे.


गेल्या वर्षी पर्यटन विभागाने पाठवलेल्या या प्रस्तावाला जलसंपदा विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे ब्रेक लागला होता. पर्यटन विभागाऐवजी जलसंपदा विभागानेच स्वतः अशा प्रकारच्या पर्यटन सुविधा किंवा हॉटेल प्रकल्प उभारावेत, असा पर्यायी सूर जलसंपदाच्या अधिकाऱ्यांकडून आवळला गेल्याने हा प्रस्ताव लांबणीवर पडला होता. परंतु, आता दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.




अनधिकृत बांधकामांचे मोठे आव्हान


एकीकडे शासकीय पातळीवर धोरणात्मक निर्णयाला विलंब होत असताना, दुसरीकडे धरणालगतच्या मोकळ्या जमिनींवर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. स्थानिक नागरिक आणि काही खासगी व्यावसायिकांनी या परिसरात बेकायदेशीर बंगले, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उभारल्याचे चित्र आहे. भविष्यात ही अनधिकृत बांधकामे हटवणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळेच या मौल्यवान जमिनींचा निसर्गपूरक, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळणे गरजेचे बनले होते.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा