FDA raids Parle Agro : 'पार्ले अ‍ॅग्रो'च्या गोदामांवर 'एफडीए'ची धाड, मुदत संपलेली उत्पादने जप्त; फ्रुटी आणि 'अ‍ॅपे फिज'चा समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परिसरात 'पार्ले अ‍ॅग्रो' कंपनीच्या गोदामावर अचानक धाड टाकून, मुदत संपलेल्या (एक्सपायरी डेट) फ्रुटी, अ‍ॅपे फिज, कोल्ड ड्रिंक्स आणि कॅन्डी ज्यूसचा १ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला आहे. चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील एल. यु. गडकरी मार्गावरील प्रयाग नगरमधील गोदामावर ही कारवाई करण्यात आली. एफडीएच्या आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सुरू केलेले हे शोधकार्य १४ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजेपर्यंत सलग ११ तास सुरू होते.



तपासणीदरम्यान मुदत संपलेल्या उत्पादनांचा मोठा साठा आढळून आल्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गोदाम सील केले आहे. याशिवाय मालाची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. एफडीएचे पुढील आदेश येईपर्यंत या गोदामातून कोणत्याही अन्नपदार्थाची विक्री किंवा वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.



राज्यात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्यपदार्थ निर्मिती संस्था आणि हॉटेल्सवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध 'डोमिनोज पिझ्झा' चालवणाऱ्या जुबिलेंट फूडवर्क्स लि.च्या चार आऊटलेट्सचे खाद्य व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील विलेपार्ले (पश्चिम), बोरीवली (पश्चिम) आणि घाटकोपरच्या आर-सिटी मॉल मधील तीन, तर सातारा जिल्ह्यातील एका आऊटलेटचा समावेश आहे.



तपासणीदरम्यान या आऊटलेट्समध्ये एफएसएसएआय परवाना न दर्शवणे, पिण्याच्या पाण्याची अनुपलब्धता, अन्न साठवणुकीतील त्रुटी, कीटक नियंत्रणाचा (पेस्ट कंट्रोल) अभाव आणि स्वच्छतेच्या मानकांचे उल्लंघन आढळून आले होते. बोरीवली येथील आऊटलेटमध्ये १५ टक्के नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. या सर्व आऊटलेट्सना कच्चे व शिजवलेले अन्न वेगळे ठेवणे, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांमध्ये फरक ठेवणे, फ्रीझरचे तापमान नियंत्रित ठेवणे आणि उपकरणांची नियमित स्वच्छता करण्याचे निर्देश एफडीएकडून देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी