BMC News : डॉ.भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी इंटॅकवरच; करार संपून आठ वर्षांचा लोटला कालावधी

नवीन संस्थेची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरु



मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भायखळा राणीबागेतील डॉ भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीसाठी नेमण्यात आलेल्या जमनालाल बजाज फाऊंडेशन आणि इंटॅक सोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर याच्या देखभालीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी १५ वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुढील १५ वर्षांचा करार म्हणजे २०२७पर्यंत गृहीत धरण्यात आले होते. परंतु याला मान्यता देण्यात आली नाही. परंतु सन २०२० पर्यंत याची देखभाल केली जात असली तरी सध्या याची देखभालीसाठी संबंधित संस्थेची नेमणूकच करण्यात न आल्याने आता याची देखभाल करावी कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


जमनालाल बजाज फाऊंडेशन यांच्याबरोबरच सन २००३मध्ये करार करण्यात आला होता. याचा १५ वर्षांकरता केलेला हा ठराव जानेवारी २०१८ला संपुष्ठात आला. त्यानंतरही ही वास्तू जमनालाल बजाज फाऊंडेशन आणि इंटॅकच्या ताब्यातच आहे. ही वास्तू महापालिकेने ताब्यात घेण्याचा ठराव महापालिकेच्या सभागृहात करण्यात आला होता. परंतु आजतागायत ही वास्तू महापालिकेच्या ताब्यात आलेली नसून मेसर्स इंटॅक आणि बजाज फाऊंडेशन यांच्याच ताब्यात आहे. या वास्तू संग्रहालयाची इमारत पुरातन वास्तूमध्ये मोडत आहे. कोविडनंतर येथील वस्तूसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले. त्यानंतर सन २०२५ रोजी वस्तू संग्रहालय पुन्हा सुरु करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. परंतु या संग्रहालयाकरता पुढील व्यवस्था होत नाही तोपर्यंत हे वास्तूसंग्रहालय इंटॅक यांनी पहावे अशाप्रकारचे आदेश देण्यात आले आहे. तेव्हापासून याची देखभाल इंटॅकच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे या वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीसाठी आता नवीन संस्थेची आवश्यकता असून त्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.



सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सर्व समावेश यंत्रणा नेमण्याकरता आवश्यक असलेली सर्व बाबींचा अभ्यास करून मसुदा निविदा तयार करून लेखा लेखा अधिकारी यांच्या छाननीकरता पाठवण्यात यावा तसेच हा विषय गटनेत्यांच्या सभेत ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला असता त्याला मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीसाठी नवीन संस्थेची नेमणूक केली जाणार आहे.


भायखळ्यातील राणीबागेत असलेल्य भाऊदाजी लाड वस्तुसंग्रहालय अर्थात म्युझियमची जागा भाडेकरारावर देण्यात आला. परंतु या करारातील अटींचा भंग करत या जागेवर पार्टीचे आयोजन, शुटींग तसेच इतर कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने मनसेचे तत्कालिन गटनेते संदीप देशपांडे आणि तत्कालिन मनसे नगरसेविका समिता नाईक यांनी याचा करार रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार याच्या भाडेकरार पुढे वाढवून देण्यात आला नव्हता.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.