INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार आहे. याआधी शनिवारी कसोटीच्या पहिल्या दिवशी खेळ सकाळी दहा वाजता सुरू झाला होता. पावसामुळे पहिल्या दिवशी बराच वेळ वाया गेल्यामुळे रविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ दहा ऐवजी सकाळी ९.४५ वाजता सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. एरवी कसोटी सामन्यात दररोज ९० षटके टाकणे अपेक्षित असते. पण गॉल कसोटीत पहिल्या दिवशी पावसामुळे बराच वेळ वाया गेल्यामुळे रविवारी ९८ षटके टाकण्याचे नियोजन आहे.



श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला जात आहे. गॉल कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय पहिल्या दिवशी भारतासाठी फायद्याचा ठरला. भारतीय संघाने पहिल्या दिवशी ७३ षटकांत दोन बाद २८८ धावा केल्या. आता दुसऱ्या दिवशी धावा काढण्याचा वेग वाढवून भारतीय संघ श्रीलंकेवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे तर श्रीलंका भारताची कोंडी करून लवकर विकेट मिळवण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता आहे.



संक्षिप्त धावफलक : गॉल कसोटी, पहिला दिवसाचा खेळ संपला; भारत २ बाद २८८ धावा. यशस्वी जयस्वाल ३२ धावा (धावचीत), केएल राहुल ७७ धावा (रिटायर्ड हर्ट), देवदत्त पडिक्कल नाबाद १३१ धावा, शुभमन गिल १६ धावा, ऋषभ पंत नाबाद २७ धावा. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने घेतली एक विकेट.
Comments
Add Comment

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या