Nashik : SIR प्रक्रियेसाठी मतदारांनी १७ ऑगस्टपूर्वी एन्युमरेशन फॉर्म भरण्याचे आवाहन

Nashik : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेंतर्गत मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत मतदारांनी एन्युमरेशन फॉर्म (E.F.) भरून सादर करणे आवश्यक असून, त्यासाठी १७ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.


मतदारांनी सर्वप्रथम electoralsearch.eci.gov.in (https://electoralsearch.eci.gov.in/) या संकेतस्थळावर जाऊन आपल्या EPIC क्रमांकाद्वारे मतदार यादीतील नाव तसेच संबंधित BLOची माहिती तपासावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह एन्युमरेशन फॉर्म ऑनलाइन किंवा संबंधित BLOमार्फत ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे. तसेच ECINET अ‍ॅपच्या माध्यमातूनही फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.



SIR प्रक्रियेदरम्यान BLO मतदारांच्या घरी भेट देऊ शकतात. त्यामुळे मतदारांनी BLOला आवश्यक सहकार्य करून आपली प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. फॉर्म वेळेत न भरल्यास मतदार यादीतील नावाबाबत अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


SIR संदर्भातील मदतीसाठी 0253-2310523 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत कायम असल्याची खात्री करून SIR प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण