Antara Banerjee : अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये आरपीएफ जवानांवर केला रेझरने हल्ला

मुंबई : मॉडेल आणि वेब सिरीज अभिनेत्री अंतरा बॅनर्जी (३१) हिला १२ ऑगस्ट रोजी अरवली एक्सप्रेसमध्ये जागेचे आरक्षण नसल्यामुळे झालेल्या वादानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांवर रेझर ब्लेडने हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एका शूटिंगसाठी सुरतला जात असताना, केवळ स्लीपर-क्लासचे तिकीट असूनही अंतरा कथितरित्या आरक्षित एसी डब्यात घुसली होती. (Antara Banerjee)



नेमकं प्रकरण काय ?


ही घटना बोरिवली व डहाणू दरम्यान रात्री सुमारे ९.३० ते १०.५० च्या दरम्यान घडली. एफआयआरनुसार, एका प्रवाशाने अंतरा बॅनर्जीला आरक्षित जागा खाली करण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर, त्या प्रवाशाने तिकीट कलेक्टर हरिकेश त्रिपाठी आणि आरपीएफला याची माहिती दिली. आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक यामिनीकांत मिश्रा यांनी सांगितले की, त्यांनी आणि कॉन्स्टेबल राजेश कुमार यांनी हस्तक्षेप केला, परंतु अंतरा बॅनर्जीने अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आणि हिंसक झाली. पोलिसांनी सांगितले की, त्यानंतर तिने ब्लेड उगारले आणि मिश्रा तसेच स्वतःला जखमी केले. मिश्रा यांनी आरोप केला की, अंतराने त्यांचा गणवेश आणि मोबाईल फोनचेही नुकसान केले. आणखी वाद टाळण्यासाठी आरपीएफच्या जवानांनी एसी डब्याचे दरवाजे बंद केले. डहाणू रेल्वे स्थानकावर उतरवून जीआरपीच्या ताब्यात देण्यापूर्वी, अंतराने पळून जाण्यासाठी काच फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हा सगळा प्रकार तासभर चालला ज्यामुळे प्रवासीही हादरले. (Antara Banerjee)



पोलिसांनी ताब्यात घेतले पण...


दुसऱ्या दिवशी सकाळी बोरीवली रेल्वे पोलिसांनी अंतराला ताब्यात घेतले. बोरीवली जीआरपीचे निरीक्षक कुंडा गवाडे म्हणाले की, एसी कोचचे तिकीट न मिळाल्याने अंतरा अस्वस्थ झाली असेल, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नातेवाईक किंवा कायदेशीर सल्लागाराशी संपर्क साधण्यास सांगितले असता, तिने नकार दिला आणि अटक करण्याची मागणी केली. “एफआयआर दाखल झाल्यानंतर मात्र ती शांत झाली,” असे गवाडे यांनी सांगितले. १३ ऑगस्टच्या एफआयआरमध्ये अंतराला आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी तिच्यावर सुरक्षेला धोका निर्माण करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत करणे, हल्ला करणे आणि हेतुपूर्वक अपमान करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला. तिला नोटीस बजावण्यात आली आणि नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. (Antara Banerjee)

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास