Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेकडून मुख्य मार्गासह हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल सेवा रद्द, तर काही गाड्या पर्यायी मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. दुसरीकडे पश्चिम रेल्वेने बोरीवली-भाईंदरदरम्यान नियोजित केलेला जंबो ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Mumbai Local Mega Block,)

ठाणे-कल्याण मार्गावर मेगाब्लॉक


मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याणदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. या काळात सीएसएमटीहून सकाळी 9.34 ते दुपारी 2.17 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन फास्ट आणि सेमी-फास्ट लोकल ठाणे-कल्याणदरम्यान डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, डोंबिवली आणि ठाकुर्ली येथे अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवासाला साधारण 10 मिनिटांचा विलंब होऊ शकतो.



कल्याणहून सकाळी 10.28 ते दुपारी 2.58 दरम्यान सुटणाऱ्या अप फास्ट आणि सेमी-फास्ट लोकलही स्लो मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा येथे अतिरिक्त थांबे असतील. मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गातही आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. (Sunday Mega Block)

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी ब्लॉक


पनवेल-वाशीदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 दरम्यानच्या लोकल रद्द राहतील. तसेच बेलापूर/पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेतील लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र पोर्ट लाईनवरील सेवा सुरू राहणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. (Mumbai Local Train)

ट्रान्स-हार्बर सेवांवरही परिणाम


ठाणे-पनवेलदरम्यान सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 आणि पनवेल-ठाणेदरम्यान सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत काही ट्रान्स-हार्बर लोकल रद्द राहतील. मात्र ठाणे-वाशी/नेरूळदरम्यान सेवा सुरू राहणार आहे.

पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना दिलासा


पश्चिम रेल्वेने बोरीवली-भाईंदरदरम्यान 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 12.30 ते 16 ऑगस्ट पहाटे 4.30 या वेळेत नियोजित केलेला चार तासांचा जंबो ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दिवसा मेगाब्लॉक असणार नाही.

मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांनी रविवारी प्रवासाचे नियोजन करताना वेळापत्रक तपासावे आणि शक्य असल्यास अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे. (Railway Mega Block)
Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म