Vijay Chaudhary : व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजपकडून विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी

मुंबई : कथित ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर बेछूट आरोप करणे आणि आक्षेपार्ह विधाने करणे नंदुरबारमधील भाजपचे नेते तथा माजी महामंत्री विजय चौधरी (Vijay Chaudhary) यांना चांगलेच भोवले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होणाऱ्या विविध ऑडिओ क्लिप्समुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाने चौधरी (Vijay Chaudhary) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.


गेल्या काही दिवसांपासून विजय चौधरी (Vijay Chaudhary) यांच्या कथित ऑडिओ क्लिप्समुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. या क्लिप्समध्ये शासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ मंत्र्यांसोबतचे त्यांचे संभाषण समोर आले होते. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या स्नुषा तथा भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याशिवाय मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या संवादाच्या ऑडिओ क्लिप्समुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजीही चव्हाट्यावर आली होती.



दुसऱ्या एका क्लिपमध्ये भाजप नेते विजयकुमार गावित यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात आले होते. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप झाल्यानंतर गावित समर्थकांमध्ये तीव्र संताप पसरला होता. या प्रकरणी डॉ. हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांच्याविरोधात पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण प्रकारामुळे आक्रमक झालेल्या गावित समर्थकांनी विविध पोलीस ठाणी आणि तहसील कार्यालयात निदर्शने करत चौधरी यांच्यावर कठोर कारवाईची आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी लावून धरली होती. (Vijay Chaudhary)



दरम्यान, या सर्व ऑडिओ क्लिप्स बनावट असून 'एआय'च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) साहाय्याने त्यात छेडछाड करण्यात आल्याचा दावा विजय चौधरी (Vijay Chaudhary) यांनी केला होता. त्यांच्या मुलाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र, पक्षाची नाहक बदनामी होत असल्याचे पाहून अखेर भाजपने विजय चौधरी यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्यात आले आहे. (Vijay Chaudhary)

Comments
Add Comment

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री