IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर गुंडाळला. भारताच्या ४६२ धावांच्या प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या डावात १७८ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे.



सोनल दिनुषा आणि यष्टीरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला यांनी ६ व्या गड्यासाठी १४६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांना ताटकळत ठेवले. अखेर प्रसिध कृष्णाने डिकवेलाला ८० धावांवर बाद करत ही जोडी फोडली. दिनुषाने ७८ व्या षटकात आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर मानव सुथारने प्रभात जयसूर्याला बाद केले, तर पुढच्याच षटकात जडेजाने शतकीवीर दिनुषाला पायचित केले. त्यानंतर सुथारने लाहिरू कुमाराला यष्टिचित करत श्रीलंकेचा डाव संपवला.



श्रीलंकेच्या संघाने फॉलो-ऑन वाचवण्यात यश मिळवले. श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर संपल्यानंतर पंचांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याची (स्टम्प्स) घोषणा केली. आता चौथ्या दिवशी भारतीय संघ १७८ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.



डिकवेलाचा नकोसा विक्रम : या खेळीमुळे डिकवेलाच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक न ठोकता सर्वाधिक ५०+ धावा (अर्धशतके) करण्याचा अनच्छित विक्रम नोंदवला गेला. त्याच्या नावावर आता २३ कसोटी अर्धशतके आहेत, पण एकही शतक नाही. या यादीत भारताचे माजी सलामीवीर चेतन चौहान १६ अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.



रवींद्र जडेजाचा ३५० बळींचा टप्पा : रवींद्र जडेजाने केशरा नुवंथाला बाद करत कसोटी कारकिर्दीतील ३५० वी विकेट पूर्ण केली. अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच कसोटीत ४,००० पेक्षा जास्त धावा आणि ३५० पेक्षा जास्त बळी घेणारा तो कपिल देव यांच्यानंतर दुसरा भारतीय आणि जागतिक स्तरावर चौथा खेळाडू बनला.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून