Metro Slab Collapse : मुंबईत मोठी दुर्घटना टळली! मिरा रोडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; स्कूल व्हॅन थोडक्यात बचावली

मीरा रोड :  मुंबई आणि उपनगरांमध्ये मेट्रोचे काम वेगाने सुरू असताना सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोडमधील गोल्डन नेस्ट परिसरात मेट्रोच्या कामादरम्यान मोठा स्लॅब अचानक रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. यावेळी रस्त्यावरून स्कूल व्हॅन जात होती. स्लॅबचा काही भाग व्हॅनवर कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Mira Road)


मिळालेल्या माहितीनुसार, गोल्डन नेस्ट परिसरात मेट्रोच्या कामासाठी बांधकाम सुरू होते. सोमवारी अचानक मेट्रोच्या कामाचा मोठा स्लॅब रस्त्यावर कोसळला. त्याच वेळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन तेथून जात होती. स्लॅबचा भाग व्हॅनवर पडल्याने काही क्षणांसाठी चालक आणि विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली. मात्र, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. (Mira Bhayandar)



थोडक्यात बचावली मुलं


या घटनेत स्कूल व्हॅनमधील विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र अचानक स्लॅब कोसळल्याने विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Metro Work)



स्लॅब कोसळल्यामुळे वाहतुक कोंडी


घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेला मलबा बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. स्लॅब कोसळल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे काही काळ परिसरात वाहतूककोंडी झाली. (Metro Slab Collapse)



पुढील तपास सुरु


घटनेची माहिती मिळताच मिरा रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या दुर्घटनेमागचे नेमके कारण काय, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि स्लॅब कोसळण्यामागे तांत्रिक कारण आहे का, याचा तपास केला जात आहे. (Mumbai News,)


दरम्यान, मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी बांधकाम ठिकाणी अधिक काळजी घेण्याची मागणी होत आहे. (Slab Collapse)


Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून