Ashok Kharat : 18 गंभीर गुन्ह्यांच्या फेऱ्यात अशोक खरात, 31 ऑगस्टला पुढील सुनावणी

Ashok Kharat : दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि भविष्याची भीती दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या स्वयंघोषित भोंदू अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्याविरुद्धच्या प्रकरणातील कायदेशीर कारवाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात दाखल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात सोमवारी पाचवी सुनावणी पार पडली. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) असलेल्या खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सध्या न्यायालयात दोषारोपपत्राच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.



खरातविरोधात १८ गंभीर गुन्हे दाखल


संशयित खरातविरोधात नाशिकसह विविध भागात एकूण १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी आठ गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित असून, इतर गुन्ह्यांमध्ये फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि बेकायदेशीर सावकारीशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार २० मार्चपासून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीकडून तपासाला गती देण्यात आली असून, नाशिक सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.


सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या पहिल्या गुन्ह्यात तब्बल १०५ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तपासाची व्याप्ती आणि खरातविरोधातील कायदेशीर कारवाईचे गांभीर्य स्पष्ट होत आहे. पुढील सुनावणीकडे आता लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण