Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय सायबर सुरक्षा यंत्रणा 'CERT-In' (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) कडून क्रोम युजर्ससाठी एक अत्यंत गंभीर सुरक्षेचा इशारा जारी करण्यात आला आहे. ब्राउझरमधील काही तांत्रिक त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या उपकरणाचा ताबा घेऊ शकतात, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.



काय आहे नेमका धोका ?


केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डेस्कटॉपसाठीच्या गुगल क्रोमच्या विविध व्हर्जनमध्ये 'युज-आफ्टर-फ्री' स्वरूपाच्या गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींचा वापर करून हॅकर्स तुमच्या नकळत सिस्टीममध्ये प्रवेश मिळवू शकतात. युजरला एखादी संशयास्पद किंवा विशेष तयार केलेली वेब लिंक पाठवून त्याला ती उघडण्यास भाग पाडले जाते. एकदा युजरने त्या लिंकवर क्लिक केले की, हॅकर्स दूरवरूनच तुमच्या कॉम्प्युटरमध्ये स्वतःचा कोड रन करू शकतात.



या माहितीला बसू शकतो मोठा फटका


जर हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेण्यात यशस्वी झाले, तर युजर्सच्या अत्यंत संवेदनशील डेटावर गदा येऊ शकते. यामध्ये, तुमचे वैयक्तिक पासवर्ड्स आणि ऑनलाइन बँकिंग डिटेल्स चोरीला जाणे. सिस्टीमची मेमरी खराब होणे किंवा कॉम्प्युटर पूर्णपणे हँग (DoS) होणे, युजरच्या परवानगीशिवाय कॉम्प्युटरमधील डेटा हाताळला जाणे.



कोणत्या युजर्सना सर्वाधिक धोका?


हा इशारा विंडोज (Windows), मॅक (macOS) आणि लिनक्स (Linux) या तिन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर क्रोम वापरणाऱ्यांसाठी लागू होतो.


Windows आणि macOS: व्हर्जन 151.0.7922.137/.138 पेक्षा जुने व्हर्जन वापरणारे युजर्स


Linux: व्हर्जन 151.0.7922.137 पेक्षा जुने व्हर्जन वापरणारे युजर्स



बचावासाठी क्रोम लगेच कसे अपडेट कराल?


गुगलने या सुरक्षेतील त्रुटी सुधारण्यासाठी नवीन पॅच अपडेट रोलआउट केला आहे. त्यामुळे युजर्सनी खालील सोप्या स्टेप्स वापरून आपले ब्राउझर तात्काळ अपडेट करून घ्यावे:


१. कॉम्प्युटरवर Google Chrome ओपन करा.


२. उजव्या बाजूला वर असलेल्या तीन डॉट्स (Menu) वर क्लिक करा.


३. तिथे Help पर्यायावर जाऊन About Google Chrome निवडा.


४. क्रोम आपोआप नवीन अपडेट शोधून ते डाउनलोड करण्यास सुरुवात करेल.


५. डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर Relaunch बटणावर क्लिक करा, जेणेकरून नवीन सिक्युरिटी पॅच लागू होईल.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी