Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या गायनात अडथळा आणल्याप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी व खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याची संभाजीनगर येथील भाजपा नगरसेवक नंदकुमार गवळी यांची मागणी


मुंबई : नवी दिल्ली येथे दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनास जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नंदलाल सुरेश गवळी यांनी काँग्रेसनेत्या सोनिया गांधी, खा. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथील जवाहर नगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. (FIR Filed)


तक्रारीत नमूद केल्यानुसार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (२४ अकबर रोड) झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन सुरू असताना वरील तिन्ही नेत्यांनी परस्पर संकेत व हावभाव करून, तसेच उपस्थित व्यक्तींना निर्देश देऊन गायनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचे एका दृश्य-श्राव्य चित्रफितीत प्रथमदर्शनी दिसून येते, असा दावा गवळी यांनी केला आहे. (Vande Mataram)


गुन्हा दिल्ली येथे घडला असला तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १७३ (१) अन्वये तो “झिरो एफ.आय.आर.” म्हणून नोंदवून संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्याकडे वर्ग करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाचे मूळ व्हिडिओ फुटेज, सीसीटीव्ही फुटेज, संबंधित यूट्यूब व्हिडिओचे मेटाडेटा व मूळ डिजिटल प्रत तातडीने सुरक्षित करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे. (Vande Mataram)

Comments
Add Comment

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची