Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन देण्यात येणार आहे. तसेच गेल्या दीड वर्षापासून अनुदानापासून वंचित असलेल्या महिला बचत गटांसाठीही बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महिला बचत गटांना देण्यात येणारे कमाल २५ हजार रुपयांचे खेळते भांडवल लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील कार्यवाही अंतिम टप्प्यात असून प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर बचत गटांना खेळते भांडवल वितरित केले जाणार आहे. (Divyanag Pension )


महिला व बाल कल्याण समितीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल संजय तुर्डे यांच्या दालनात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि महापालिका प्रशासनाची बैठक आज पार पडली. या बैठकीत महिलांच्या सक्षमीकरणासह दिव्यांग व्यक्ती, महिला बचत गट आणि महिला उद्योजकतेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. (Women and Child Welfare Committee)




मीनाताई कांबळी, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, संजना घाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी महानगरपालिका उप आयुक्त (शिक्षण) तथा संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, प्रमुख समाज विकास अधिकारी भास्कर जाधव, समाज विकास अधिकारी वेदिका पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती खांडेकर, विभा जाधव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समिती अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या प्रयत्नातून भांडूप येथे उभारण्यात येणाऱ्या महिला भवनाच्या कामाबाबत चर्चा झाली. महिला भवनाच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाल्यानंतर इमारत व बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


तसेच महिलांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभागनिहाय व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला भवन, दिव्यांग पेन्शन योजना, महिला बचत गटांना खेळते भांडवल आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण या निर्णयांमुळे महिला व दिव्यांगांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म