Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी. रोडच्या मागील रस्त्यावर 17 ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना धडक दिल्याची घटना घडली. धडकेनंतर चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Mira Road Accident)


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक चारचाकी वाहन वेगाने रस्त्यावरून जाताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला काही नागरिक उभे असतानाच हे वाहन अचानक त्यांच्या दिशेने येते आणि काही जणांना धडक देते. धडकेनंतर नागरिक रस्त्यावर पडल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, चालकाने वाहन थांबवण्याऐवजी वेग वाढवत तेथून पळ काढल्याचे समोर आले आहे. (Accident video)



या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील रस्त्यांवर बेफाम वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांचा वचक आहे की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी भरधाव वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, या अपघातात नेमके किती जण जखमी झाले आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच संबंधित वाहन आणि चालकाची ओळख पटली आहे का, याचीही माहिती मिळालेली नाही. (Road Accident)


व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहनाचा शोध घेऊन चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे. (Hit And Run)


Comments
Add Comment

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.