Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक


मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील मच्छिमार बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि त्यांच्या बोटींवर आकारण्यात आलेला दंड यांसारख्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी महत्त्वाची बैठक पार पडली. खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत झालेल्या या बैठकीत मच्छीमारांच्या अडीअडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


लहान आकाराच्या मासेमारी जाळ्यांचा वापर केल्यामुळे स्थानिक मच्छिमार बांधवांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते लवकरात लवकर मागे घेण्यात यावेत आणि त्यांच्यावर आकारण्यात आलेल्या दंडामध्ये योग्य ती शिथिलता देण्यात यावी, असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पारंपरिक पद्धतीने समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोणत्याही मच्छीमार बांधवावर प्रशासनाकडून अनावश्यक कारवाई केली जाऊ नये, अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली.


केंद्राच्या धर्तीवर राज्यात राबविण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने'मध्ये मच्छीमारांसाठी अनेक महत्त्वपूर्ण व कल्याणकारी तरतुदी करण्यात आल्या आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त लाभ तळागाळातील मच्छीमार बांधवांपर्यंत पोहोचवावा, तसेच या योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे (कॅम्प) आयोजन करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीस विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक मच्छीमार बांधव उपस्थित होते.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि