Nashik Earthquake : नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik Earthquake : नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहे. दरम्यान बुधवारी सकाळीही ९ वाजता पेठ (Peth) तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पेठ (Peth) तालुक्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसर हा या धक्क्यांनी हादरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याने काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.



मंगळवारी दुपारीही भूकंपाचे सौम्य धक्के


मंगळवारी दुपारी देखील पेठ (Peth Earthquake), सुरगाणा (Surgana Earthquake) आणि दिंडोरी (Dindori Earthquake) या तीन तालुक्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसर तसेच पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, जांभूळमाळ आणि हरणगाव भागामध्ये दुपारी १२:४० मिनिटांनी भूकंपाचे जाणवले तर दुपारी १२:४५ मिनिटांनी दिंडोरी तालुक्यातील ननाशी आणि बागडीचा पाडा परिसरात जमीन हादरली. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



भूकंपांच्या धक्क्यांची मालिका सुरूच


एकंदरीतच नाशिक जिल्ह्यात भूकंपांच्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात वारंवार होणाऱ्या या भूकंपांमुळे प्रशासनाने तत्काळ याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण