Pune Crime : नसरापूरची पुनरावृत्ती! जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या; घराशेजारील तरुण संशयित ताब्यात

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात १० वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती. रात्री साडेनऊच्या सुमारास लेंडेस्थळ परिसरात ओढ्याच्या कडेला झाडाजवळ तिचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Pune Crime)



दुपारपासून मुलगी होती बेपत्ता :


मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना एका २५ वर्षीय तरुणावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Pune Crime)



विशेष म्हणजे, मुलीचा शोध सुरू असताना संशयित तरुण ग्रामस्थांमध्ये मिसळून पोलिसांसोबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सहभागी झाला होता. मात्र, तपासादरम्यान पोलिसांचा त्याच्यावरील संशय वाढला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. (Pune Crime)



घराशेजारीच राहत होता संशयित :


पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी हा पीडित मुलीच्या घराशेजारी राहत होता. ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला घरातून शेताच्या दिशेने नेल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे. (Pune Crime)



पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी :


घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते. पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांशी संवाद साधून तपासाबाबत माहिती घेतली. दरम्यान, फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. (Pune Crime)



या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातील निष्कर्ष आणि वैद्यकीय व फॉरेन्सिक अहवालानंतर घटनेचे अधिक तपशील स्पष्ट होणार आहेत. (Pune Crime)

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण