Cab Driver Viral Video : OTP वरून कॅब चालक-पॅसेंजरमध्ये वाद; मराठीत OTP सांगताच चालक भडकला, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापरावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील एका मराठी प्रवाशाचा कॅब चालकासोबत झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रवाशाने कॅबचा OTP मराठीत सांगितल्यानंतर चालकाने त्यावर आक्षेप घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘अॅप इंग्रजीमध्ये आहे, त्यामुळे OTP देखील इंग्रजीमध्ये सांगा,’ असे चालक प्रवाशाला सांगताना दिसतो. (Cab Driver Viral Video)


व्हायरल व्हिडीओमध्ये चालकाने मराठीत OTP सांगण्यास नकार देत ‘मराठीत अॅप नाही’ असा युक्तिवाद केल्याचे दिसून येते. त्यावर प्रवाशाने महाराष्ट्रात कॅब चालवत असल्याने आपण मराठीतच संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर दोघांमध्ये भाषेवरून शाब्दिक वाद झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. (Cab Driver Viral Video)



व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल :


या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, कॅब चालकाच्या भूमिकेवर अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करताना स्थानिक भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान करणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. मात्र, हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि मुंबईतील कोणत्या परिसरातील आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे व्हिडीओतील दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. (Cab Driver Viral Video)



परिवहन मंत्र्यांच्या भूमिकेचीही चर्चा :


दरम्यान, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि इतर सार्वजनिक वाहनचालकांनी महाराष्ट्र मोटार वाहन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या वाहनचालकांनी मराठी भाषेचा सन्मान करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. (Cab Driver Viral Video)



परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली असून, ती पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले आहे. मराठी भाषेच्या वापरावरून निर्माण झालेल्या या कॅब वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात स्थानिक भाषा, प्रवाशांशी संवाद आणि वाहनचालकांच्या वर्तनाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (Cab Driver Viral Video)




Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या