Chalisgaon : 'आई-वडील तुझेही आहेत’ म्हटल्यावर वाद आणखीनच वाढला, भावासोबत वृद्ध आई-वडिलांनाही मारहाण

Chalisgaon : आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून सख्ख्या भावांमध्ये झालेला वाद थेट हाणामारीपर्यत पोहोचल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा नं. ४ येथे घडली. या घटनेत वृद्ध आई-वडिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी मोठ्या भावासह त्याच्या पत्नीविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात (Chalisgaon Rural Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.



नेमकं प्रकरण काय ?


करगाव तांडा नं. ४ येथील वृद्ध दाम्पत्याला तीन मुले आहेत. हे दाम्पत्य लहान मुलाकडे गेले असताना मधला मुलगा त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी आला होता. त्यावेळी मोठा भाऊ घराबाहेर उभा होता. मधल्या भावाने मोठ्या भावाला, आई-वडील तुझेही आहेत, तू देखील त्यांना खाऊ-पिऊ घातले पाहिजे, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. मोठ्या भावाने शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मधल्या भावाने शिवीगाळ करू नको, असे सांगितले असता मोठ्या भावाने जवळचा दगड उचलून त्याच्या डोक्यात मारला. तसेच लाकडाने खांदा आणि उजव्या हाताच्या मनगटावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.



वृद्ध आई-वडिलांनाही मारहाण


दोन्ही भावांमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी वृद्ध आई-वडील मध्ये आले. यावेळी मोठ्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी काठीने मारल्याचा आरोप आहे. तसेच आईला जमिनीवर ढकलून दिल्याने त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. दरम्यान, भांडणाची माहिती मिळताच सर्वात लहान भावाचे कुटुंब घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी दोन्ही भावांमधील वाद सोडवला. यावेळी मोठ्या भावाने मधल्या भावाला पुन्हा भेटल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हाणामारीत मोबाईलचे नुकसान झाल्याचेही समोर आले आहे.


या घटनेप्रकरणी मधल्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून मोठा भाऊ आणि त्याची पत्नी या दोघांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा (Chalisgaon Rural Police Station) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार विजय शिंदे करीत आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण