Viral Video : "चेहरा झाकायला नकाब मग सुरक्षेसाठी हेल्मेट का नाही?": ट्रॅफिक पोलिसांचा तरुणींना आपुलकीचा धडा, व्हिडिओ व्हायरल

वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ट्रॅफिक पोलिसांकडून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जातात. असाच एक अनोखा आणि मन जिंकणारा प्रकार नुकताच समोर आला असून, विनाहेल्मेट स्कूटी चालवणाऱ्या तरुणींना दंड न आकारता अत्यंत आपुलकीने आणि विनोदी शैलीत नियमांची आठवण करून देणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.



रात्रीच्या गस्तीदरम्यान घडला प्रकार




मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याने विनाहेल्मेट स्कूटीवरून जाणाऱ्या दोन बुरखाधारी विद्यार्थिनींना थांबवले. नेहमीप्रमाणे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता अधिकाऱ्याने अत्यंत शांतपणे आणि मित्राप्रमाणे संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यांनी तरुणींना "तुम्ही शिक्षण घेताय ना?" असा प्रश्न विचारत, "स्कूटी खरेदी करताना त्यासोबत मिळालेले हेल्मेट कुठे आहे?" असा सवाल केला. रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देताना अधिकारी म्हणाले की, "कोणताही अपघात झाला तर त्याचा सर्वात मोठा फटका तुमच्या कुटुंबाला आणि आई-वडिलांना बसतो."



"नकाबसारखेच हेल्मेटही गरजेचे"


गप्पा मारताना अधिकाऱ्याने मुलींना मजेशीर पण डोळ्यात अंजन घालणारा सल्ला दिला. "ज्याप्रमाणे तुम्ही चेहरा झाकण्यासाठी मास्क किंवा नकाब वापरता, त्याचप्रमाणे डोक्याच्या संरक्षणासाठी हेल्मेट घालणे देखील तितकेच आवश्यक आहे," असे त्यांनी सांगितले. दंडाची पावती फाडण्याऐवजी अधिकाऱ्याने तरुणींकडून एक महत्त्वाचे वचन घेतले—यापुढे घरातून बाहेर पडताना त्या कधीही हेल्मेट विसरणार नाहीत. तरुणींनी वचन दिल्यानंतर अधिकाऱ्याने त्यांचे आभार मानत त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली.



नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव


हा संपूर्ण प्रसंग '@tsi_ajay_sharma' या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोलिसांच्या या समंजस आणि आपुलकीच्या भूमिकेमुळे नेटकरी कमालीचे प्रभावित झाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये युजर्स या अधिकाऱ्याचे भरभरून कौतुक करत आहेत. "लोकांमध्ये धाक निर्माण करण्यापेक्षा असा आपुलकीचा संवादच नियमांचे पालन करायला शिकवतो," अशा प्रतिक्रिया देत नागरिकांनी या पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीला सलाम केला आहे.

Comments
Add Comment

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु