Anna Bansode : वांद्रेतील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी; ७ दिवसांत बैठक घेण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील एमएसआरडीसीच्या फुट ओव्हर ब्रिजवरील डिजिटल एलईडी जाहिरात फलकांची परवानगी, वैधता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सखोल चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधानभवन येथे अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुंबई महानगरपालिका, एमएसआरडीसी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या फलकांवरील सतत बदलणाऱ्या जाहिराती व व्हिडिओंमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली.



जाहिरात फलकांच्या परवानगी प्रक्रियेतील कागदपत्रे, निविदा प्रक्रिया तसेच माहिती अधिकारांतर्गत मागविलेली संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. एमएसआरडीसीने सात दिवसांत संबंधित विभागांची बैठक घ्यावी. या बैठकीस वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित करून फलकांची वैधता, परवानगी प्रक्रिया आणि वाहतूक सुरक्षेचा आढावा घ्यावा तसेच सविस्तर अहवाल सादर करावा, असे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Comments
Add Comment

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या