Mumbai Metro : गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार

- मंत्री मंगल प्रभात लोढा; रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचे निर्देश


मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि उपनगरांमध्ये भाविकांची होणारी अफाट गर्दी लक्षात घेता, प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि अडथळामुक्त व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रात्री उशिरापर्यंत, तसेच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, गणेशोत्सवाच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर नियमित मेगाब्लॉक तसेच रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येऊ नयेत, असे निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत.

गणेशोत्सवात मुंबईसह उपनगरांतील विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे दर्शन घेण्यासाठी आणि बाप्पाच्या आगमनानिमित्त लाखो नागरिक रात्रीच्या वेळीही मोठ्या संख्येने बाहेर पडतात. यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर लोकल रेल्वे आणि मेट्रोचा वापर करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या फेऱ्यांमधील अंतर (हेडवे) कमी करून अधिक फेऱ्या चालविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळेत मेट्रोची शेवटची फेरी उशिरापर्यंत सुरू ठेवून भाविकांसाठी विशेष फेऱ्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही सांगण्यात आले आहे.



गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांवर प्रवाशांचा मोठा ताण येतो. दिवस आणि रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकांवर होणारी प्रचंड गर्दी पाहता, गणेशोत्सवाच्या प्रारंभापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर कोणतीही तांत्रिक कामे वा नियमित मेगाब्लॉक किंवा रात्रकालीन ब्लॉक घेऊ नयेत, असे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले आहेत. तसेच, रात्री उशिरा गणेश दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल फेऱ्या चालवाव्यात, अशी सूचनाही करण्यात आली आहे.


मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सुविधा


प्रमुख रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात करून प्रवाशांच्या सुरक्षेसह गर्दी व्यवस्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भाविकांना तिकीट काढताना रांगेत उभे राहावे लागू नये, म्हणून मेट्रोवरील सर्व तिकीट काऊंटर, ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स, डिजिटल आणि क्यूआर तिकीट प्रणाली मेट्रोची शेवटची फेरी होईपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानकांवरील लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्राथमिक उपचार केंद्रे देखील सेवा सुरू असेपर्यंत सतत उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
Comments
Add Comment

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन