Nashik Crime : प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात गेली अन्...; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : नाशिकमध्ये आणखी एका नव्या भोंदूबाबाचा नवा प्रताप समोर आला आहे. प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या महिलेच्या अपेक्षेवर चांगलेच पाणी फेरले गेले आहे. भोंदूबाबाने या महिलेच्या श्रद्धेचा फायदा घेत तिच्याकडून ८३ हजारांची उकळपट्टी केली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


हे संपूर्ण प्रकरण गुजरातमधील बलसाड येथे सुरु झाले. बलसाड येथील एका महिलेची चार वर्षांपूर्वी नाशिकमधील तरुणाशी ओळख झाली. पुढे जाऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर प्रियकराने मात्र लग्नास नकार देत नाशिक गाठले. मात्र प्रियकराच्या प्रेमात नितांत बुडालेल्या महिलेला त्याच्याशी लग्न व्हावे ही अपेक्षा होती. त्याच्याबरोबर लग्न व्हावे, ही अपेक्षा तिला भोंदूबाबाच्या दारात घेऊन गेली. अघोरी पूजाविधी केल्यास लग्न होईल, असे सांगत भोंदूबाबाने तिच्याकडून तब्बल ८३ हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.यासाठी तिने जमापुंजी आणि आईचे सर्व दागिने विकले.



दैवी सामर्थ्याने मारण्याची धमकी


खर्च करूनही भोंदूबाबाने म्हटल्याप्रमाणे झाले नाही. त्याचा जाब तिने भोंदूबाबाला विचारला असता त्याने दैवी सामर्थ्याने मारण्याची धमकी दिली. दरम्यान, तिचा प्रियकरही भोंदूचा शिष्य झाला. न्यायासाठी तिने पंचवटी पोलीस गाठले. त्यावेळी प्रियकराने दोन वर्षांनी लग्न करू, असे पोलिसांसमोर सांगून वेळ निभावून नेली. एका माध्यम प्रतिनिधीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी तिचा संपर्क झाला. अंनिसचे कार्यकर्ते तिला पंचवटी पोलीस ठाण्यात घेऊन गेले.



महिलेवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न


दरम्यान, न्यायासाठी लढत असताना प्रियकर आणि भोंदूबाबाने महिलेवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी पंचवटी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी केला.दरम्यान, संबंधित महिलेचा अर्ज प्राप्त झाला असून, तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा विचार करता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच महिलेला पोलिस ठाण्यात बोलावून तिची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पंचवटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिली.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण