Nashik : त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराला स्थगिती, पर्यायी जागांचा शोध

Nashik : दर्शन पथासाठी त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय (Trimbakeshwar Sub-District Hospital) अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचालींना स्थानिकांचा तीव्र विरोध होत असल्याने प्रशासनाने या प्रक्रियेला पुढील आठ दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. रुग्णालयासाठी पर्यायी जागांचा शोध घेऊन त्याबाबत चाचपणी केली जाणार आहे. सध्या आरोग्य विभागाने सुचविलेल्या जागेलाही जागामालकाने विरोध केल्याने रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Nashik Trimbakeshwar News)



रुग्णालय स्थलांतराला स्थानिकांचा विरोध


त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी शहरातील रस्त्यांवर होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी दर्शन पथ उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय (Panchayat Samiti Office) आणि पशुवैद्यकीय दवाखाना (Veterinary Clinic) हटविण्याचे नियोजन आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालय नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तुपेफाटा येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाला स्थानिकांकडून विरोध होत आहे. (Nashik Trimbakeshwar News)



पर्यायी जागांचा विचार करावा


जिल्हा आरोग्य विभागाने त्र्यंबक पोलीस ठाण्यासमोरील (Trimbak Police Station)केशव ढोन्नर यांच्या जागेचा रुग्णालयासाठी प्रस्ताव दिला. मात्र, ढोन्नर यांनी या जागेला विरोध केला आहे. १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी ही जागा अपुरी असून, परिसरात अतिक्रमण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाहनतळासमोरील जागेसह महादेवी ट्रस्टच्या अन्य जागांचाही विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रशांत गायधनी यांनीही पर्यायी जागांचा विचार करण्याची मागणी केली आहे. देवस्थानच्या ३१ एकर जागेपैकी पाच एकर जागा रुग्णालयासाठी आरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. अमृत कुंभ, वाहनतळ, बाजार समितीचा पहिला मजला तसेच देवस्थानच्या जागेवर रुग्णालय उभारण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Nashik Trimbakeshwar News)



तूर्तास उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराला स्थगिती


दरम्यान, स्थानिकांचा वाढता विरोध आणि नागरिकांचा रेटा लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालय (Trimbakeshwar Sub-District Hospital) स्थलांतराची प्रक्रिया सध्या आठ दिवसांसाठी थांबविण्यात आली आहे. नागरिकांचे म्हणणे ऐकून पर्यायी जागांचा विचार केला जाणार असल्याने रुग्णालयाचा प्रश्न तूर्तास ‘जैसे थे’ राहिला आहे. नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार (Municipal Council President Triveni Tungar) यांनीही रुग्णालय स्थलांतरित होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''