Shweta Tiwari on Raj Thackeray : "मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का?" श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना थेट परखड सवाल

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिला सोशल मीडियावर अत्यंत अपमानास्पद कमेंट्स आणि अश्लील शिवीगाळाचा सामना करावा लागला आहे. याप्रकरणी श्वेताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही स्क्रीनशॉट्स शेअर करत सोशल मीडियावरील विकृत मानसिकतेविरोधात जोरदार ताशेरे ओढले आहेत. विशेष म्हणजे, आपल्याला ट्रोल करणारे काही युजर्स स्वतःला 'मराठी माणूस' आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे समर्थक सांगत असल्याचा दावा श्वेताने केला आहे.



"सुशिक्षित कुटुंबातील पुरुषच करतात अपमान"



इन्स्टाग्राम स्टोरीवरून संताप व्यक्त करताना श्वेताने म्हटले आहे की, सध्या सोशल मीडियावर एका अतिशय गंभीर आणि चिंताजनक प्रवृत्तीचा उगम झाला असून तो अत्यंत वेगाने पसरत आहे. ऑनलाईन व्यासपीठांवर महिलांना अश्लील भाषेत ट्रोल करणे आणि त्यांना शिवीगाळ करणे हा जणू काही लोकांचा रोजचा खेळ बनला आहे. कोणत्याही वयाची, कोणत्याही क्षेत्रातील किंवा सामाजिक स्तरातील महिला असो ती ऑनलाईन विकृतीची आणि टार्गेटेड शिवीगाळाची बळी ठरत आहे. समाजात कोणत्याही पार्श्वभूमीतून आलेला पुरुष सोशल मीडियाचा वापर करून एखाद्या महिलेचा अनादर करू शकतो, ही बाब अत्यंत संतापजनक आहे. या संपूर्ण प्रकारात श्वेताने एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे लक्ष वेधले आहे. तिच्या मते, अशा प्रकारे अश्लील भाषा वापरणारे किंवा ट्रान्सग्रेशन करणारे लोक हे केवळ अशिक्षित किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच असतात असा गैरसमज समाजात आहे. मात्र, वास्तवात महिलांचा अपमान करणारे बहुतांश लोक हे सुशिक्षित, चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतलेले आणि समाजात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कुटुंबांतील असतात. ज्या पुरुषांच्या घरात आई, पत्नी, बहीण आणि मुलगी यांसारख्या महिला असतात आणि जे स्वतःला सुसंस्कृत मानतात, तेच पुरुष ऑनलाईन विश्वात दुसऱ्या अनोळखी महिलेचा अपमान करताना किंवा तिच्यासाठी अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर करताना अजिबात संकोच बाळगत नाहीत. सुशिक्षित असूनही महिलांचा आदर न करण्याची ही दुटप्पी मानसिकता अधिक धक्कादायक आणि चिंताजनक असल्याचे श्वेताने या पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.



मराठी माणसाकडून शिवागाळ


आपल्याला आलेल्या अश्लील मेसेजचे स्क्रीनशॉट्स शेअर करत श्वेताने या प्रवृत्तीवर कडाडून हल्ला चढवला आहे. "महिलांना ऑनलाईन व्यासपीठांवर अशा अश्लील भाषेत अपमानास्पद मेसेज पाठवल्यानंतर ही माणसे घरी जाऊन स्वतःच्या कुटुंबाचा, विशेषतः घरातील महिलांचा सामना कसा करत असतील?" असा जळजळीत प्रश्न तिने उपस्थित केला आहे. या ट्रोलिंगमध्ये तिला आलेला मेसेज पाठवणारी व्यक्ती मनसे प्रमुख राज ठाकरे किंवा त्यांच्या राजकीय पक्षाची पाठीराखी असल्याचे दिसून आल्यानंतर श्वेताने तीव्र खंत व्यक्त केली. तिने नमूद केले की, हा मुद्दा आता केवळ ऑनलाईन ट्रोलिंगपुरता मर्यादित राहिला नसून तिच्यासाठी अत्यंत वैयक्तिक बनला आहे. श्वेताचे संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात गेले असून तिचे वडीलही मुंबईतच लहानाचे मोठे झाले आहेत. लहानपणापासूनच तिने 'मराठी माणूस' असण्यामागे असणारा अभिमान, स्वाभिमान आणि प्रतिष्ठा जवळून अनुभवली आहे. मराठी संस्कृती ही नेहमीच स्त्रियांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि आदराचा सन्मान करणारी संस्कृती मानली गेली आहे, असा विश्वास श्वेताने व्यक्त केला. मात्र, जेव्हा स्वतःला गर्वाने 'मराठी माणूस' म्हणवणारे लोकच सोशल मीडियावर महिलांच्या खाजगी मेसेज बॉक्समध्ये (DM) जाऊन अत्यंत खालच्या पातळीवरची शिवीगाळ करतात, तेव्हा संस्कृतीच्या या दाव्यांवर शंका उपस्थित होते. "अशा अपमानास्पद वर्तनालाच आता 'मराठी माणूस' असणे म्हटले जाणार का?" असा अत्यंत बोचरा आणि गंभीर सवाल श्वेताने या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.



राज ठाकरे यांना थेट परखड सवाल


महिलांचा ऑनलाईन अनादर करणाऱ्या मुद्द्यावरून श्वेताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना थेट कटघऱ्यात उभे करत एक अत्यंत परखड सवाल विचारला आहे. "राज ठाकरेजी, जर स्वतःला तुमचे समर्थक किंवा कार्यकर्ते म्हणवणारे लोक महिलांशी अशा प्रकारे अश्लील भाषेत वर्तन करत असतील, तर त्यांचे हे कृत्य तुम्हाला खरोखरच मान्य आहे का?" असा रोखठोक प्रश्न तिने उपस्थित केला आहे. आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना श्वेताने नमूद केले की, केवळ तोंडाने मराठी भाषा बोलणे, स्वतःला 'मराठी माणूस' म्हणून मिरवणे किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा पोकळ दावा करणे म्हणजे खरी संस्कृती नव्हे. कोणत्याही समाजाची किंवा संस्कृतीची खरी ओळख ही त्या समाजात महिलांना मिळणाऱ्या आदरावरून ठरत असते. त्यामुळे केवळ प्रांतीय अस्मिता जपण्यापेक्षा महिलांचा मानसन्मान राखणे आणि त्यांच्याशी आदराने वागणे हीच खरी मराठी संस्कृतीची मूल्ये आहेत, असा थेट टोला तिने या पोस्टद्वारे लगावला आहे.

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या