TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे. यासंदर्भात केवळ टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 मध्ये सुधारणा करणारी राजपत्र अधिसूचना 21 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आली असून, त्याचबरोबर नवा नियम प्रभावी झाला आहे.



माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, टीव्ही प्रसारण क्षेत्रात निष्पक्ष स्पर्धा आणि व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी जाहिरातींच्या कालावधीवरील मर्यादा हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीव्ही चॅनेलसाठी 12 मिनिटांची जाहिरात मर्यादा वर्ष 2006 मध्ये लागू करण्यात आली होती. त्यावेळी देशात केवळ 62 टीव्ही चॅनेल होते. आता त्यांची संख्या 900 पेक्षा अधिक झाली आहे. याशिवाय केबल टीव्हीच्या डिजिटायझेशननंतर डीटीएच, केबलसारख्या प्लॅटफॉर्मवर दर्शकांना मोठ्या संख्येने चॅनेल उपलब्ध आहेत.



माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार, टीव्ही उद्योगात आता पुरेशी स्पर्धा अस्तित्वात आहे. तसेच डिजिटल माध्यमांवर जाहिरातींच्या कालावधीवर अशी कोणतीही मर्यादा नसल्यामुळे पारंपरिक टीव्ही चॅनेलसाठी समान संधीचा मुद्दाही उपस्थित होता.सरकारचे मत आहे की, जाहिरातींच्या कालावधीवरील मर्यादा हटवल्यामुळे टीव्ही चॅनेलना जाहिरात बाजारात अधिक लवचिकता मिळेल आणि ईज ऑफ डुइंग बिझनेसला चालना मिळेल.आता टीव्ही चॅनेलवर जाहिरातींसाठी निर्धारित केलेली कमाल 12 मिनिटांची मर्यादा लागू राहणार नाही.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’