Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावरील L&T फाट्यावर कंटेनर पलटी, वाहतुकीवर परिणाम

Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावर (Sinnar-Nashik Highway) एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी असलेल्या L&T फाटा येथे आज भलामोठा कंटेनर वळण घेत असताना वळणाच्या मधोमध पलटी झाल्याची घटना घडलीय. कंटेनर चालकाला वेग आणि वळणाचा अंदाज न आल्याने, तसेच रस्ता अरुंद असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगण्यात येत आहे.



वाहतुकीवर परिणाम


या मार्गावरून एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये (MIDC companies) जाणाऱ्या वाहनांची तसेच कामगार व पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, घटना घडली त्यावेळी वळणावर कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. वळणाच्या अगदी मधोमध कंटेनर पलटी झाल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याचा परिणाम महामार्गावरील वाहतुकीवरही झाला असून वाहनांची कोंडी निर्माण झाली होती. पलटी झालेला कंटेनर हटविण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, L&T फाट्यावरील अरुंद व धोकादायक वळणामुळे वारंवार अपघाताची शक्यता निर्माण होत असल्याने संबंधित प्रशासनाने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण, योग्य दिशादर्शक फलक व सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.



कडवा कॅनलजवळ भीषण अपघात


दरम्यान, पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर (Panchale–Somthane Road) पिंपळगाव कडवा कॅनलजवळ (Pimpalgaon Kadva Canal) आज पहाटे सुमारे ६ वाजेच्या सुमारास टाटा मॅजिक वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक MH 20 BC 7264 असा आहे. दरम्यान, या भीषण अपघातात वाहनचालक अलीम आदम सहा (वय ३०, रा. मालेगाव) यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून, तीन जण सुखरूप असल्याचे समजते. दरम्यान, त्याच घटनास्थळापासून अवघ्या १० मीटर अंतरावर सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा दुचाकीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे समजते. जखमी व्यक्तीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे एकाच ठिकाणी काही तासांच्या अंतराने दोन अपघात झाल्याने या रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण