BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी


सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष प्रदर्शन


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या संकल्पनेतून राख्यांचे विशेष प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.


महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड ऑफीस) २४ ऑगस्ट २०२६ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तर, महानगरपालिका मुख्यालयात दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांनी स्वतः तयार केलेल्या विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक आकर्षक राख्या, घरगुती खाद्यपदार्थ तसेच विविध शोभिवंत व हस्तकलेच्या वस्तू नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून महिला बचत गटांच्या कौशल्याला, मेहनतीला आणि आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


 

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ


या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने व स्वहस्ते तयार केलेल्या सुंदर आणि नाविन्यपूर्ण राख्यांचाही प्रदर्शन-विक्रीमध्ये समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला आणि आत्मविश्वासाला योग्य व्यासपीठ मिळावे, या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे.



महानगरपालिका मुख्यालयात विशेष स्टॉल


मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष स्टॉल उभारण्यात येणार आहे. यासोबतच महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्येही प्रदर्शन-विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.



नागरिकांना आवाहन


महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या मेहनतीला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला मुंबईकरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या महानगरपालिका विभाग कार्यालयात तसेच आयोजित राखी प्रदर्शनाला भेट देऊन वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म