FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील तेरा खाद्य आस्थापनांचे परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित केली आहेत. राज्यातील विविध शहरांमध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये अन्नाची साठवणूक, स्वच्छता, तापमान नियंत्रण आणि खाद्यपदार्थ हाताळणीबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.


एफडीएच्या अधिकाऱ्यांनुसार, मुंबईतील कुलाबा येथील बॉम्बे प्रेसिडेंसी रेडिओ क्लब, मॅकडोनाल्ड्स, मालाड येथील नोवारा, नरिमन पॉइंट येथील स्टेटस रेस्टॉरंट, खार येथील खार जिमखाना, सांताक्रूझ येथील बजरंग स्वीट मार्ट आणि अंधेरी पश्चिम येथील एएसएम हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय नागपूरमधील ड्यू ब्रदर्स शावरमा, नाशिकमधील अवंती स्नॅक्स आणि अमरावतीमधील पिंटू यादव स्वीट्स यांचे परवानेही निलंबित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर आणि परभणी येथील छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल, म्हारो गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टार बेकरी, परभणी यांच्यावरही अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाबद्दल कारवाई करण्यात आली.



कुलाबा येथील बॉम्बे प्रेसिडेंसी रेडिओ क्लबच्या स्वयंपाकघराची तपासणी करताना मोठ्या प्रमाणात जिवंत माश्या, मृत झुरळे आणि उघडे कीटक आढळल्याचे एफडीएने सांगितले. खाद्यपदार्थांच्या जवळ रसायनांची साठवणूक करण्यात आली होती, तर काही भांडी थेट जमिनीवर ठेवण्यात आली होती. तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित नियमांचे पालन न होण्याचे प्रमाण 47 टक्के आढळल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. तसेच खार जिमखान्याच्या तपासणीत खाद्यपदार्थांची सुरक्षित साठवणूक, खाद्यतेलाची गुणवत्ता, तापमान नियंत्रण आणि स्वच्छता व्यवस्थेत त्रुटी आढळल्या. स्वच्छ भांड्यांवर घाणेरडे पाणी सांडणे, अस्वच्छ भांडी, साचलेले पाणी आणि अन्नाची नासाडी यांसारख्या बाबीही निदर्शनास आल्या. या गंभीर त्रुटींमुळे खार जिमखान्याचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले.


एफडीएने कारवाई झालेल्या सर्व आस्थापनांना निलंबनाच्या कालावधीत खाद्यपदार्थांची खरेदी, उत्पादन, विक्री आणि वितरण बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन पुढेही सुरू राहिल्यास संबंधित आस्थापनांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांनी स्वच्छता, सुरक्षित साठवणूक आणि अन्न हाताळणीच्या निर्धारित मानकांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने