Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थ, प्रतिबंधित गुटखा-पान मसाला आणि इतर खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलच्या स्वयंपाकघरात गंभीर अनियमितता आढळून आल्या. तर मुंबईतील सात ठिकाणांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले असून, गुटखा-पान मसाल्याच्या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. (FDA Maharashtra)


छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक परिसरातील गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड हॉटेलची FDAच्या पथकाने अचानक तपासणी केली. यावेळी स्वयंपाकघरात खराब झालेले पनीर, काळवंडलेले वापरलेले तेल आणि उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ आढळले. खराब पनीरमधून दुर्गंधी येत होती, तसेच त्यावर साठवणूक किंवा वापरण्याची अंतिम तारीख नमूद केलेली नव्हती.  (FDA Action)



हॉटेलच्या स्वयंपाकघरातील स्वच्छतेची स्थितीही अत्यंत खराब असल्याचे तपासणीत समोर आले. मुख्य शौचालयाच्या दाराजवळ भाज्या कापल्या जात होत्या. भांडी धुण्याच्या जागेत उकडलेले नूडल्स उघडे ठेवण्यात आले होते. कांदे आणि इतर कच्चा माल जमिनीवर, भिंतीला लागून ठेवण्यात आला होता. तसेच माशांपासून संरक्षणासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याचे आढळले. वारंवार वापरलेले स्वयंपाकाचे तेल पूर्णपणे काळे पडले होते. ( Food and Drug Administration)


या हॉटेलवर यापूर्वीही नियमभंगाबद्दल कारवाई करण्यात आली होती. डिसेंबर 2025 मध्ये सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने एप्रिल 2026 मध्ये 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्याने FDAने अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या कलम 32(3) अंतर्गत हॉटेलचा FSSAI परवाना निलंबित केला.



मुंबईतील 7 ठिकाणांवर कारवाई


या विशेष मोहिमेदरम्यान मुंबईतही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. कुलाबा येथील मॅकडोनाल्ड्ससह बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब, मालाड येथील नोव्हारा, नरिमन पॉईंट येथील स्टेटस रेस्टॉरंट आणि खार जिमखाना यांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळल्यानंतर संबंधित ठिकाणांचे परवाने निलंबित करण्यात आले. ( Licence Suspended)



गुटखा-पान मसाल्याविरोधातही धडक कारवाई


FDAने प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याविरोधातही कारवाई केली. मुंबईतील तीन दुकाने सील करण्यात आली असून, या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली. कारवाईत सुमारे 1.95 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे. ( Banned Tobacco Products)


दूध व दुग्धजन्य पदार्थांसह खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता तपासण्यासाठी राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत FDAने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या