Nashik : लग्न जमवण्याचे अमिष दाखवून स्मशानात अघोरी पूजा, भोंदू खंडागळे ताब्यात

Nashik : नाशिकमध्ये आणखी एका नव्या भोंदूबाबाचा नवा प्रताप समोर आला आहे. प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या महिलेच्या अपेक्षेवर चांगलेच पाणी फेरले गेले आहे. भोंदूबाबाने या महिलेच्या श्रद्धेचा फायदा घेत तिच्याकडून हजारो रुपयांची उकळपट्टी केली आहे. गुजरात राज्यामधील एका पीडित महिलेला नाशिक मधील तिच्या प्रियकराने बलसाड येथून नाशिकला आणले.


पंचवटी मधील विशाल रामदास खडांगळे या भोंदूने त्यांचे लग्न लावून देतो असे त्यांना सांगितले. त्यासाठी स्मशानात अघोरी पूजा करून पैसे उकळविले.परंतु अघोरी पूजा करूनही लग्न जमत नाही, आपली फसवणूक झाली असे पीडितेच्या लक्षात आल्यानंतर तिने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


सदर महिलेची तिच्या नात्यातील नाशिक येथील जितू अण्णाराव पवार याच्याशी चार वर्षापूर्वी ओळख झाली होती. नंतर त्यांचे प्रेम झाले. त्याने तिला लग्नास होकार दिला. पण चार वर्षानंतर त्याने लग्नास नकार दिला. तिने जाब विचारला असता त्याने तिला मारहाण केली. जितू हा नाशिकच्या फुलेनगर येथील विशाल रामदास खडांगळे या भोंदू सोबत भगतगिरी करत होता. पिडीत महिलेने भोंदूला जितुची तक्रार केल्यानंतर तिला नाशिकला बोलाविले. जितू तिच्याशी व्यवस्थित वागेल व तुमचे लग्न जमेल असे भोंदूने तिला आश्वासन दिले .



स्मशानात अघोरी पूजा


या भोंदूने या महिलेला भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या अमरधाम स्मशानात निम्म्या रात्री बोलावले आणि तिथे अघोरी पूजा करण्याचा बहाणा केला. स्मशानात प्रेत जाळतात त्या ठिकाणी पिडितेला बसवून भोंदूने जळालेल्या प्रेताची राख , लिंबू व लाह्या घेऊन पीडितेच्या अंगावर मंत्र मारल्याचा बहाणा करून फेकले. काही लिंबू गोदावरी नदीत फेकले तर काही प्रेत ठेवण्याच्या लोखंडी जाळीवर ठेवले. अघोरी पूजेच्या बहाण्याने विशाल खडांगळे या भोंदूने पीडितेकडून अगोदर मोठमोठ्या रकमा ऑनलाईन स्वरूपात स्वीकारल्या. या भोंदूने तिच्याकडून एकूण ७७ हजार रुपये उकळले.मात्र तिचे लग्न होऊ शकले नाही. आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने या भोंदूला अघोरी पूजेच्या खर्चापोटी दिलेल्या रक्कमेची मागणी केली. मात्र या भोंदूने आणि त्याला सामील झालेल्या तिच्या प्रियकराने तिला दमदाटी व मारहाण करायला सुरुवात केली.



भोंदू खंडागळेसह दोघे ताब्यात


दरम्यान नाशिक मधील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी तिने संपर्क केला. तिची आपबीती ऐकल्यावर कार्यकर्त्यांनी पीडीतेला सोबत घेऊन तातडीने पोलीस स्टेशन गाठले. संबंधित भोंदू व त्याचा साथीदार यांची तातडीने चौकशी करून, पुराव्यांची पडताळणी करून, दोषींवर जादूटोणाविरोधी कायदा तसेच इतर आवश्यक कायद्यान्वये कडक कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रकारचे विनंती पत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पोलीस स्टेशनला दिले.त्यानुसार पोलिसांनी पडताळणी करून भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदू आणि त्याचा साथीदार यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण