Nashik : वीजचोरीविरोधात महावितरणची धडक कारवाई, जिल्ह्यात एकाच दिवशी १४ जणांवर गुन्हे दाखल

Nashik : वीजचोरी करून व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात महावितरणच्या (Mahavitran) नाशिक भरारी पथकाने धडक कारवाई केली असून, सिन्नर, येवला आणि वणी परिसरातील १४ जणांविरुद्ध एकाच दिवशी, १९ ऑगस्ट रोजी, मनमाड पोलीस ठाण्यात (Manmad Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विद्युत अधिनियम, २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये ही कारवाई करण्यात आली.



एकाच दिवशी १४ जणांवर गुन्हे दाखल


महावितरणच्या भरारी पथकाने १९ जून २०२६ रोजी सिन्नर तालुक्यातील निमगाव येथे सात ठिकाणी, तर ६ व ७ जुलै रोजी येवला तालुक्यातील जळगाव नेऊर व चिचोंडी शिवारातील १२ ठिकाणी वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली होती. तसेच वणी शहरातील चार ठिकाणीही वीजचोरीची प्रकरणे आढळून आली होती. या कारवाईनंतर संबंधित ग्राहकांना वीजचोरीपोटी आकारण्यात आलेली थकबाकी भरण्याची संधी देण्यात आली. त्यापैकी नऊ ग्राहकांनी नियमानुसार थकीत वीजबिलाचा भरणा केला. मात्र, उर्वरित १४ ग्राहकांनी थकबाकी न भरल्याने त्यांच्याविरुद्ध मनमाड पोलीस ठाण्यात (Manmad Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले.



वीजचोरीविरोधातील मोहीम सुरूच राहणार


ही तक्रार नाशिक भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिलकुमार रामनारायण तिवारी यांनी दाखल केली आहे. ही कारवाई सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गीते, कोकण परिक्षेत्राचे उपसंचालक सुमितकुमार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वीजचोरीमुळे महावितरणच्या यंत्रणेवर तसेच प्रामाणिक वीज ग्राहकांवरही परिणाम होतो. त्यामुळे अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांविरोधात महावितरणने कठोर भूमिका घेतली असून, वीजचोरीविरोधातील ही धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या