Vishakha Raut News : विशाखा राऊतांचे जात प्रमाणपत्र रद्द; सदा सरवणकर, प्रिया सरवणकरांची एकनाथ शिंदेंशी भेट

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. या निर्णयानंतर अवघ्या दोन तासांत शिवसेनेचे सदा सरवणकर आणि त्यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Vishakha Raut News)


प्रिया सरवणकर यांनी यापूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीत विशाखा राऊत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, प्रिया सरवणकर यांना नगरसेवकपद मिळावे यासाठीच आपले जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा आरोप विशाखा राऊत यांनी यापूर्वी केला होता. (Caste Certificate)



सरवणकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट


शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजता सदा सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४० ते ४५ मिनिटे चर्चा झाली. मात्र, या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा  झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


दरम्यान, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. सादर केलेल्या कागदपत्रांमधून कुणबी जात वैधता प्रमाणपत्रधारकांशी रक्ताचे नाते सिद्ध होत नसल्याचे समितीने नमूद केले आहे. तसेच पालघरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले नसल्याचेही समितीच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


समितीने राऊत यांना रद्द केलेले जात प्रमाणपत्र आदेश मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाविरोधात त्यांना ९० दिवसांच्या आत विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे अपील करता येणार आहे.


विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद आरक्षित जागेशी संबंधित असल्याने जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचा त्यांच्या पदावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रमाणपत्र रद्द होणे आणि नगरसेवकपद रद्द करण्याची अंतिम प्रशासकीय किंवा कायदेशीर प्रक्रिया या स्वतंत्र बाबी आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या नगरसेवकपदावर कायदेशीर टांगती तलवार असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

Rajgira Kheer : नवरात्रीच्या उपवासात थकवा जाणवतोय ? दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ट्राय करा ही चवदार राजगिरा खीर.

  [caption id="attachment_1066892" align="aligncenter" width="850"] राजगिरा, दूध, बदाम आणि ड्रायफ्रूट्सचा हा परफेक्ट संगम तुमच्या उपवासाचा उत्साह

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

"अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ..."; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई: सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी