Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी १६ चालकांची नियुक्ती; जपानमध्ये वर्षभर विशेष प्रशिक्षण

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संचालनासाठी मनुष्यबळाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) प्रकल्पासाठी १६ हायस्पीड रेल्वे चालकांची नियुक्ती केली असून, या सर्व चालकांना जपानमध्ये एक वर्षाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जपानी शिंकान्सेन तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पासाठी चालकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच सुरक्षा मानके आणि कार्यपद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची लांबी ५०८ किलोमीटर असून, गुजरातमधील वापी ते साबरमती हा टप्पा डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर मुंबई ते साबरमती संपूर्ण मार्ग डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. रेल्वे रूळ, विद्युतीकरण, सिग्नलिंग, दूरसंचार आणि इतर पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाच्या संचालनाची अचूक वेळ निश्चित केली जाणार आहे. (Mumbai-Ahmedabad Bullet Train)



चालकांना विशेष वेतनश्रेणी


नियुक्त करण्यात आलेल्या बुलेट ट्रेन चालकांचा समावेश अ-कार्यकारी (NE)-४ श्रेणीत करण्यात आला आहे. त्यांना ४० हजार ते १.२५ लाख रुपयांची औद्योगिक महागाई भत्ता (IDA) वेतनश्रेणी लागू आहे. याशिवाय NHSRCLच्या नियमांनुसार विविध भत्ते आणि इतर सुविधाही मिळणार आहेत.



२६० कर्मचाऱ्यांना जपानी भाषेचे प्रशिक्षण


प्रकल्पासाठी केवळ चालकांनाच प्रशिक्षण दिले जात नसून इतर कर्मचाऱ्यांनाही जपानी कार्यपद्धती आणि संस्कृतीशी परिचित करून दिले जात आहे. आतापर्यंत सुमारे २६० कर्मचाऱ्यांनी मूलभूत जपानी भाषा आणि संस्कृतीचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच NHSRCLच्या अनेक अधिकाऱ्यांनी जपानी भाषा प्रावीण्य परीक्षा (JLPT) उत्तीर्ण करून N1 ते N5 स्तरांपर्यंतची प्रमाणपत्रे मिळवली आहेत. (Mumbai-Ahmedabad Bullet Train)



५०८ किमी मार्गावर तीन आगार


बुलेट ट्रेनच्या रेकची नियमित तपासणी, देखभाल आणि दुरुस्तीसाठी ठाणे, सुरत आणि साबरमती येथे आगार उभारण्यात येत आहेत. या आगारांमध्ये आपत्कालीन देखभाल, रेकची दुरुस्ती, री-प्रोफाइलिंग तसेच उपकरणे आणि बोगींच्या देखभालीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध असतील.


साबरमती येथील रोलिंग स्टॉक आगारात हलकी तसेच मोठी देखभाल करण्याची सुविधा असेल. सुरुवातीला चार तपासणी मार्गिका आणि दहा देखभाल-दुरुस्ती मार्गिका उभारल्या जाणार आहेत. प्रवासी सेवा वाढल्यानंतर तपासणी मार्गिका आठ आणि देखभाल-दुरुस्ती मार्गिका २१ करण्याची तरतूद करण्यात आली आहे.


भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी पायाभूत सुविधांसोबतच प्रशिक्षित चालक आणि तांत्रिक मनुष्यबळाची तयारी सुरू झाल्याने प्रकल्पाच्या संचालनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म