Bhiwandi : भिवंडीत ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण, मारहाणीतील गंभीर जखमांमुळे ६५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू

भिवंडी : भिवंडीतील ठाणे रोड परिसरात, रोज घराबाहेर बसून धिंगाणा घालणाऱ्यांना हटकण्याची मोठी किंमत एका कुटंबाला मोजावी लागली. वाद विकोपाला गेल्यानंतर झालेल्या झटापटीत ६५ वर्षीय जमीर अहमद मोहम्मद कासिम यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.



दररोज आठ ते दहा जण जमीर अहमद मोहम्मद कासिम यांच्या घराबाहेरच्या परिसरात मोबाईलचा आवाज वाढवून मोठ्या आवाजात बोलत बसायचे अथवा व्हिडीओ बघत - ऐकत बसायचे. मुद्दाम मोठ्या आवाजात गप्पा मारत बसायचे. या त्रासाला वैतागून जमीर अहमद मोहम्मद कासिम यांनी त्रास देणाऱ्यांना हटकले. यावरून वाद झाला. थोड्याच वेळात वाद विकोपाला गेला आणि मोठ्या आवाजात धिंगाणा घालणाऱ्यांनी जमीर अहमद मोहम्मद कासिम यांना बेदम चोपले. मारहाण असह्य झाली आणि जमीर अहमद मोहम्मद कासिम यांचा मृत्यू झाला. स्थानिक सीसीटीव्ही फूटेजमध्ये अनेकजण मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मारहाण करणाऱ्यांनी जमीर अहमद मोहम्मद कासिम यांना बेदम चोपले. जमीर अहमद मोहम्मद कासिम यांना पोटात आणि कमरेखाली लाथा मारण्यात आल्या. या मारहाणीत जमीर अहमद मोहम्मद कासिम गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.



घटनेची माहिती मिळताच कुंभारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह भिवंडी येथील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, जमीर अहमद मोहम्मद कासिम यांचा मृत्यू अंतर्गत जखमांमुळे झाल्याचा संशय असून, मृतदेह फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. जे. जे. रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण