Bhuleshwar Ganpati Incident : मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट उंच ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती अचानक कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजून ५१ मिनिटांनी बलराम मर्चंट रोड, कबूतरखाना आणि जय अंबे चौक परिसरात ही दुर्घटना घडली. (Bhuleshwar Ganpati Incident)


मिळालेल्या माहितीनुसार, गणेशमूर्ती भायखळा येथून भुलेश्वरमधील मंडपाकडे नेण्यात येत होती. मंडपापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर असताना अचानक मूर्तीचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. या दुर्घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. (Bhuleshwar Ganpati Incident)



घटनेची माहिती मिळताच बीएमसी अग्निशमन दल, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि बीएमसी वॉर्ड कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Bhuleshwar Ganpati Incident)



जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू


या दुर्घटनेत एकूण सात जण बाधित झाले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जखमींवर उपचार सुरू आहेत.




  • जीटी रुग्णालयात तीन जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोन जखमींवर उपचार सुरू आहेत.

  • रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

  • जे. जे. रुग्णालयात दोन जखमींवर उपचार सुरू आहेत.

  • सैफी रुग्णालयात एका जखमीवर उपचार सुरू आहेत.


अशाप्रकारे, या दुर्घटनेत एकूण दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघाताचे कारण काय?


प्राथमिक तपासात रस्त्यावर मोठा खड्डा आढळून आलेला नाही. त्यामुळे मूर्तीचा तोल बिघडल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Bhuleshwar Ganpati Incident)



मृत आणि जखमींची नावे :


या दुर्घटनेत संकेत नेवशे आणि बृजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. तर वैभव घेनंद, पवन चौरसिया, लावण्या गनेर, दिव्या गनेर आणि कुणाल काशिद हे पाच जण जखमी झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रभर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशमूर्तींच्या आगमनावेळी भव्य मिरवणुका काढण्याची परंपरा मुंबईत अनेक वर्षांपासून आहे. मात्र, भुलेश्वरमधील या दुर्घटनेमुळे गणेशमूर्तींच्या वाहतुकीदरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Bhuleshwar Ganpati Incident)

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.