CM Devendra Fadnavis : मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत घडलेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त

मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) रात्री मोठी दुर्घटना घडली. २२ फूट उंचीची गणेशमूर्ती मंडपात आणत असताना अचानक तोल गेल्याने मूर्ती खाली कोसळली. या दुर्घटनेत चौघे जखमी झाले असून उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.


अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी २२ फूट उंचीची गणेशमूर्ती वाजतगाजत भुलेश्वरमधील कबुतरखाना परिसरात आणत होते. रात्री सुमारे ९.५० वाजता मूर्ती परिसरात पोहोचली असताना अचानक तिचा तोल गेला आणि मूर्ती मंडळाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या अंगावर कोसळली. दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.



या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपविभाग प्रमुख संकेत नेवशे (३३) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ब्रिजेश जोशी (३०) यांच्या छातीला गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त


या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत मृत गणेशभक्तांना श्रद्धांजली वाहिली. हि घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे त्यांनी म्हटले. जखमी गणेशभक्तांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थना करत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला.

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या