Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून गुजरातमधील वडोदरा विभागातील वर्णमा येथील कॉनकॉरच्या GCT टर्मिनलपर्यंत पहिली ‘डबल-स्टॅक लाँग-हॉल’ कंटेनर ट्रेन यशस्वीपणे चालवण्यात आली. या ट्रेनने एकाच फेरीत तब्बल ३६० TEU कंटेनर्सची वाहतूक करत सुमारे ४२२ किलोमीटरचे अंतर पार केले. (Indian Railway)


या लाँग-हॉल ट्रेनमध्ये प्रत्येकी ४५ वॅगन्स असलेले दोन डबल-स्टॅक रेक्स जोडण्यात आले होते. पुढील रेकचे वजन १,८१७ टन असून त्यासाठी लोको क्रमांक ६०३११, तर मागील रेकचे वजन २,१०५ टन असून त्यासाठी लोको क्रमांक २४६९० वापरण्यात आले.


या प्रयोगामुळे एका ट्रेनमधून मोठ्या प्रमाणात कंटेनर्सची वाहतूक करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. त्यामुळे बंदरे आणि मालवाहतूक टर्मिनल्सवरील गर्दी कमी होण्यासोबतच कंटेनर्सचा मुक्काम कालावधी कमी होऊन मालाची जलद वाहतूक होण्यास मदत होणार आहे. (Indian Railway)



वेळ आणि खर्चात बचत


एकाच फेरीत अधिक कंटेनर्सची वाहतूक झाल्याने लोकोमोटिव्ह आणि कंटेनर फ्लॅट वॅगन्सची गरज कमी होईल. तसेच समान प्रमाणातील माल वाहून नेण्यासाठी लागणाऱ्या ट्रेनच्या फेऱ्याही कमी होतील. परिणामी, रेल्वे मार्गाच्या उपलब्ध क्षमतेचा अधिक कार्यक्षम वापर होऊन मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे. (Indian Railway)



पर्यावरणपूरक मालवाहतुकीला चालना


ही सेवा शाश्वत आणि पर्यावरणपूरक मालवाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. ही ट्रेन पूर्णपणे विजेवर धावणार असल्याने रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. एका डबल-स्टॅक लाँग-हॉल ट्रेनमधून मोठ्या संख्येने ट्रकच्या बरोबरीचा माल वाहून नेता येत असल्याने डिझेलचा वापर, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्याची शक्यता आहे.


या यशस्वी प्रयोगामुळे देशातील रेल्वे मालवाहतुकीची क्षमता वाढवण्यास तसेच बंदरे आणि अंतर्गत मालवाहतूक टर्मिनल्सदरम्यान जलद व कार्यक्षम कंटेनर वाहतुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. (Indian Railway)

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म