Plastic Bottle Ban : मुंबई महापालिका सर्व कार्यालयांमध्ये पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्सला बंदी

- महापालिका सभागृहात ठराव मंजूर


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख कार्यालये व आस्थापनांमध्ये एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांवर संपूर्ण बंदी घालती जाणार आहे. याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला असून याबरोबरच मुंबईतील किरकोळ दुकानांमधील प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीवर निर्बंध आणले जावेत अशाप्रकारचाही ठराव मंजूर करून याबाबत आता राज्य शासनाकडे नियमांत बदल करण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे. (Plastic Bottle Ban)


भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिका सभागृहात ही मागणी केली होती. याबाबतच्या ठरावामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धन, प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकास यासाठी विविध उपाययोजना राबविलेल्या आहेत. मात्र, आजही महानगरपालिकेच्या अनेक कार्यालयांमध्ये, रुग्णालयांमध्ये, प्रशासकीय बैठकींमध्ये, कार्यक्रमांमध्ये आणि इतर आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचा वापर सर्रास होतो. यामुळे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढून पर्यावरण, सागरी जैवविविधता आणि घनकचरा व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. (Plastic Bottle Ban)



मुंबईसारख्या महानगरात दररोज लाखो प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या वापरून टाकल्या जातात. त्यातील मोठा हिस्सा पुनर्वापर प्रक्रियेत न जाता कचऱ्यात, नाल्यांमध्ये किंवा समुद्रात पोहोचतो. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबणे, प्रदूषण वाढणे आणि पर्यावरणीय समतोल बिघडण्यास हातभार लागतो.


पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महानगरपालिकेने स्वतःपासून सुरुवात करून सर्व कार्यालये, प्रशासकीय इमारती, रुग्णालये, शाळा, उद्याने, बाजारपेठा आणि अन्य सर्व महापालिका आस्थापनांमध्ये एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचा वापर तात्काळ बंद करावा. त्याऐवजी वॉटर डिस्पेन्सर, आरओ फिल्टर, स्टील किंवा काचेच्या पुनर्वापरयोग्य बाटल्या आणि पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी सातम यांनी केली. (Plastic Bottle Ban)



याचबरोबर, मुंबईतील पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या हॉटेल्स व विशेष परवानाधारक आस्थापना वगळता इतर सर्व किरकोळ दुकाने, पानटपऱ्या, स्टॉल्स, सुपरमार्केट व इतर विक्री केंद्रांवर प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीवर बंदी अथवा कठोर निर्बंध लागू करण्याबाबत राज्य शासनाकडे आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी शिफारस करण्यात यावी, असेही ठरावात नमुद केले आहे. याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला असून आता महापालिका कार्यालयांमध्ये प्लास्टिक बॉटल्स बंदी केव्हापासून होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच प्लास्टिक बॉटल्सवरील मुंबईतील बंदी बाबत पर्यावरण खात्याच्यावतीने कोणत्या प्रकारचे पाऊल उचलले जाते याकडेही सर्वांचे लक्ष आहे. (Plastic Bottle Ban)

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या