Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. शिवांशी रामेश्वर घोलप असे या गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव असून, कुत्र्याने तिच्या गालाचा थेट चावा घेतल्याने तिला तब्बल १३ टाके पडले आहेत. या भयानक घटनेनंतर शिवांशीला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत.



शिवांशी आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. कुत्र्याने थेट तिच्या चेहऱ्याचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला. वेदनेने विव्हळणाऱ्या शिवांशीच्या किंकाळ्या ऐकून सतर्क झालेल्या शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि कुत्र्याच्या तावडीतून तिची सुटका केली. काळजाचा ठोका चुकवणारी ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शेजाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे शिवांशीचा जीव वाचला असला, तरी या हल्ल्यामुळे ती प्रचंड दहशतीखाली आहे.



शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असतानाही पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. या ताज्या घटनेनंतर शिवतेज नगरसह संपूर्ण बीड शहरात प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप जीवांचे बळी जाण्याची वाट न पाहता, भटक्या कुत्र्यांच्या या जीवघेण्या उपद्रवावर नगरपरिषद प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार, असा परखड आणि संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी