Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. भुलेश्वरच्या राजाची 22 फूट उंच मूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान अचानक कोसळली. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला, तर दोन लहान मुलींसह पाच जण जखमी झाले.


भायखळा येथील गणेशमूर्ती कार्यशाळेतून क्रेनच्या सहाय्याने ही भव्य मूर्ती भुलेश्वरकडे आणली जात होती. मंडपापासून अवघ्या काही अंतरावर असताना अचानक मूर्तीचा आधार तुटला आणि सुमारे दोन टन वजनाची मूर्ती खाली कोसळली. संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांनी मूर्ती सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात दोघेही गंभीर जखमी झाले.



संकेत यांच्या मानेपासून खालचा भाग प्लास्टरखाली आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांच्या कानातून रक्तस्राव होत होता. त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर ब्रिजेश जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



मूर्तिकाराच्या सूचनेकडे दुर्लक्ष?


या दुर्घटनेमागे मूर्ती पूर्णपणे तयार नसल्याचा दावा केला जात आहे. वृत्तानुसार, मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मूर्ती अद्याप पूर्णपणे सुकलेली नसल्याचे सांगितले होते. तसेच वेल्डिंगचे काही काम बाकी असल्याने आणखी काही दिवस मूर्ती नेऊ नये, असा सल्लाही दिल्याचे सांगितले जात आहे.


मात्र, डेकोरेटरच्या वेळापत्रकामुळे मूर्ती आगमन सोहळ्यासाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासादरम्यानच मूर्तीचा हार निसटल्याचे आणि मागील बाजूचे वेल्डिंग सुटल्याचेही सांगितले जात आहे.


भुलेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा हार निसटला आणि त्यानंतर वेल्डिंगचा आधार तुटल्याने मूर्ती अचानक खाली कोसळली. काही सेकंदांत घडलेल्या या दुर्घटनेने आगमन सोहळ्याचा आनंद शोकात बदलला.


दरम्यान, रविवारी शोकाकूल वातावरणात संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेची चौकशी सुरू असून, मूर्तीची रचना, वेल्डिंग, वाहतुकीदरम्यान घेण्यात आलेली सुरक्षा आणि संबंधितांच्या निष्काळजीपणाचीही चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा