Bhuleshwarcha Raja : 'लालबागच्या राजा'चे 'भुलेश्वरच्या राजा'वर वडीलकीचे छत्र; दुर्घटनाग्रस्त मंडळाला तब्बल २१ लाखांची आर्थिक मदत जाहीर

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध 'भुलेश्वरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'वर ओढवलेल्या दुर्दैवी संकटाच्या काळात 'लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'ने संवेदनशील पुढाकार घेत वडीलकीचे छत्र धरले आहे. मंडळावर ओढवलेल्या दुःखात पाठीशी खंबीरपणे उभे राहत लालबागचा राजा मंडळाने एकूण २१ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती आणताना झालेल्या भीषण दुर्घटनेत मंडळाचे मानद सचिव संकेत नेवशे आणि कार्यकर्ते ब्रिजेश जोशी या दोन निष्ठावंत गणेशभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गणेशोत्सव वर्तुळात तसेच भुलेश्वर परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.



या कठीण प्रसंगात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे तर दुर्घटनेत प्राण गमावलेले दिवंगत सचिव संकेत नेवशे यांच्या कुटुंबाला ५ लाख रुपये आणि दिवंगत ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबाला ५ लाख रुपये अशी प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. संकटाच्या काळात एका गणेशोत्सव मंडळाने दुसऱ्या मंडळाच्या पाठीशी अशा प्रकारे खंबीरपणे उभे राहिल्यामुळे लालबागच्या राजा मंडळाच्या या संवेदनशील निर्णयाचे संपूर्ण मुंबईतून आणि सर्व स्तरांतील गणेशभक्तांकडून मोठे कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना

जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा 'अतिरिक्त निदान प्रक्रिया' म्हणून योजनेत समावेश

मुंबई: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली

Eknath Shinde : दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागवले रिपोर्टकार्ड

नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Assembly)पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील