Nashik News : त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, पालकमंत्री महाजनांचा एसटीने प्रवास

Nashik News : आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. त्यानिमित्ताने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे महादेवांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. दुसऱ्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे भगवान त्र्यंबकेश्वराची विशेष महापूजा व अभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे.



पालकमंत्री महाजनांचा एसटीने प्रवास


नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह (Rajendra Singh) आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) हे देखील उपस्थित होते. महाजन यांच्या हस्ते आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथील गंगा गोदावरी द्वार परिसर, मेटघर ग्रामपंचायत, ब्रह्मगिरी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मिशन ग्रीन मॉन्सून (Mission Green Monsoon) मोहिमेंतर्गत नवव्या टप्प्यात देशी जातीच्या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. आतापर्यंत ५० हजार २७५ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या अभियानासह विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था, नागरिकांचे सहकार्य लाभत आहे.



कडक पोलिस बंदोबस्त


दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी (Trafic Jam) टाळण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलीस आणि होमगार्ड यांचा तगडा फौजफाटा आहे. याशिवाय फेरीच्या मार्गावर जागोजागी आरोग्य पथक असून, डॉक्टरांकडून भाविकांची तपासणी केली जात आहे. त्यासोबतच नाशिकहून त्र्यंबकेश्वरसाठी (Nashik to Trimbakeshwar) एसटी महामंडळाने अतिरिक्त बसेसची सोय केली आहे,

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण